देवगड आगाराला पत्रकारांचे निवेदन

देवगड आगाराला पत्रकारांचे निवेदन

देवगड एसटी आगार दिवसेंदिवस समस्याग्रस्त होत आहे . येथील काही कर्मचारी वर्ग प्रवासीवर्गाला देत असलेली वागणूक, मनाला वाटेल तिथे एसटीचा थांबा, वारंवार कोलमडणारे एसटीचे वेळापत्रक व लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने देवगड मधील पत्रकारबंधूनी वाहतूक नियंत्रक यांची भेट घेतली. देवगड एसटी आगारात सध्या ५५ गाड्या आहेत. यामधील ४५ एसटीगाड्या ह्या जीर्ण झाल्या आहेत. यातील ५ गाड्या पुर्णतः गळक्या आहेत. याबाबत देवगडमधील लोकप्रतिनिधीनीही देवगड एसटी आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. मात्र, याला एसटी प्रशासनाने केराची टोपली दाखविली होती. एसटी कर्मचारी मद्यप्राशन करून गाडी चालविणे, गाड्या अचानक बंद पडणे, अचानक लांब पल्लाच्या फेऱ्या रद्द करणे, प्रवाशांना समाधानकारक वागणूक न देणे, लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न देणे. यासर्व कारणासाठी देवगडमधील पत्रकार बधुंनी वाहतूक नियंत्रक प्रकाश रसाळ यांची भेट घेतली. याबाबत त्याच्याशी सकारात्मक चर्चा केली. देवगड आगाराबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना चांगली सेवा कशी देता येईल याकडे आपण स्वतः विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे आश्वासन वाहतुक नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले, हेमंत कुलकर्णी, गणेश आचरेकर आदी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget