कोंझर घाटामध्ये एसटीला अपघात; चौदा प्रवासी जखमी


कोंझर घाटामध्ये एसटीला अपघात; चौदा प्रवासी जखमी !


प्रतिनिधी 
सोनाली म्हस्के 
महाड --राज्य परिवहन महामंडळाच्या सांदोशी बोरिवली या गाडीला आज सकाळी १०.४५ वाजण्या सुमारास कोंझर घाटात अपघात झाला असून, या अपघातामध्ये १४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती एसटी मंडळाच्या महाड आगाराचे मॅनेजर श्री कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरम्यान, हा अपघात चालकाच्या हलगपणामुळे झाल्याच्या तक्रारी गाडीतील प्रवाशांनी केल्या असून यासंदर्भात संबंधित चालकांविरोधात
कारवाई करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जखमी प्रवाशांवर पाचाड येथील आरोग्यकेंद्रामध्ये उपचार सुरू असून यापैकी काही जणांना उपचारा नंतर सोडून देण्यात आल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
भारती यांनी दिली.
महाड आगारातून रोज सुटणारी सांदोशी बोरिवली ही गाड़ी क्र.एम एच २०/ बी आय १८७१ सकाळी दहा वाजता सांदोशी
गावातून बोरिवलीकडे रवाना झाली होती. पाचाड या गावी या गाडीमध्ये प्रवासी भरल्यानंतर अपघात ठिकाणी येईपर्यंत गाडीतील
विद्यार्थी व प्रवाशांनी चालक बनसोडे यांना गाडी वेगात न नेण्याची वारंवार विनंती केली मात्र विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या
विनतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगामध्ये चालक बनसोडे यांनी गाड़ी घाटामधून कोंझर गावाकडे पोहोचत असतानाच घाटातील एका वळणावर
गाडीचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला शेतांमध्ये कलंडल्याची घटना घडली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget