वृक्षारोपणाची लोकचळवळ होणे काळाची गरज - शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर


वृक्षारोपणाची लोकचळवळ होणे काळाची गरज  - शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर
शिक्षण समिती अध्‍यक्षांच्‍या हस्ते फिल्टरपाडा परिसरात वृक्षारोपण
    मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  मुंबईसह देशातील आणि राज्यातील अनेक शहरांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत असताना वृक्षारोपण हे फक्‍त एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता त्‍याची लोकचळवळ होऊन वृक्षसंवर्धन झाले पाहिजे,  ही काळाची गरज असल्‍याचे प्रतिपादन शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर यांनी केले.
पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पालिका भारत स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र, आरे कॉलनी मार्ग, फिल्टरपाडा, पवई येथे आज गुरुवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी भारत स्काऊट-गाईडस्  शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी स्‍थानिक नगरसेविका श्रीम.चंद्रावती मोरे, माजी नगरसेवक म‍निष नायर,  उप प्रमुख अभियंता(शाळा पायाभूत सुविधा कक्ष) उत्‍तम श्रोते,  उप शिक्षणाधिकारी  गोविंद कुलकर्णी,  भारत स्काऊट आणि गाईडस् च्या शिक्षिका श्रीमती पॉल हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण समिती अध्‍यक्ष  मंगेश सातमकर, स्‍थानिक नगरसेविका श्रीम.चंद्रावती मोरे व उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्ते विविध प्रजातींच्या रोपटय़ांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये संवाद साधताना शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर म्‍हणाले या परिसराचा आता झालेला विकास बघितल्‍यानंतर खुप आनंद होत आहे. यासाठी उप प्रमुख अभियंता(शाळा पायाभूत सुविधा कक्ष) उत्‍तम श्रोते व त्‍यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.यासोबतच शिक्षण विभागामार्फत भारत स्काऊट आणि गाईडस्  साठी विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणात सहभाग मिळावा यासाठी श्रीम. पॉल यांची तळमळ कौतुकास्‍पद असल्‍याचे ते म्‍हणाले. स्काऊट आणि गाईडस्  विद्यार्थ्यांची संख्या आज २० हजारांवर असून त्‍यांनी ३० हजाराचे ठेवलेल्‍या उद्दिष्‍टाबद्दल महापौरांनी शिक्षण विभागाचे कौतुक केले. याठिकाणी वर्षातून एकवेळा कार्यक्रम न ठेवता दोन ते तीन वेळा विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे,  अशी सूचनाही त्‍यांनी याप्रसंगी केली.तर उप शिक्षणाधिकारी गोविंद कुलकर्णी यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून कार्यक्रमाच्‍या आयोजनामागची भूमिका विशद केली. श्रीम. पॉल व त्‍यांचे सहकारी याठिकाणचा विकास करण्‍यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्‍पद असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शिक्षण समिती अध्‍यक्षांनी केलेल्‍या सूचनांचा निश्चितच विचार करण्‍यात येईल,  असेही त्‍यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget