जांभुळपाडा येथील महापुराला २९ वर्ष पुर्ण..

जांभुळपाडा येथील महापुराला २९ वर्ष पुर्ण

  मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) –   २६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली. कारण, याच दिवशी त्यांच्यावर जणू काही अस्मानी संकट कोसळलं. त्याला आज २९ वर्ष पूर्ण झालीत.
तारीख २४ जुलै १९८९... रायगडकरांच्या काळजात धस्स करुन जाणारी तारीख... हीच तारीख त्यांच्या अंगावर काटा आणते. रायगडच्या आंबा नदीला पूर आला... नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जांभूळपाड्यातील गावकरी साखरझोपेत होते. मात्र, ती रात्र त्यांच्यासाठी जणू काळरात्र ठरली. कारण आंबा नदीचं पाणी मध्यरात्रीच्या सुमारास थेट त्यांच्या घरात शिरलं. बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं झालं. महापूराचा तांडव इतकं महाभयानक होतं की कुणाचं घर, तर कुणाचे नातेवाईक डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले. यात ८४ जणांचा बळी गेला. या घटनेला २९ वर्ष पूर्ण झालेत. मात्र, आजही त्या पूराच्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर शहारे आणतात.२९वर्षानंतरही आंबा नदीपात्राचं रुंदीकरण आणि नदीतील गाळ काढण्यात आले.आता मात्र  जांभुळपाडा गावाला पुराच्या  धोक्याची शक्यता कमी झाले आहे.या महापूराच्या काळ्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या डोक्यात आजही घोंगावतात. प्रशासनानं अशा घटनांपासून बोध घेत खबरदारीचे उपाय केले आहे. त्यामुळे जांभुळपाडा ग्रामस्थांनमध्ये  समाधान  व्यक्त केले जात आहे.२४ जुलै १९८९ महापूराला २९ वर्षे पुर्ण झाले.
या महापुरात मृत्युमुखी पडलेल्या  लोकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सुधागड-पाली तहसिलदार बी.एन .निंबाळकर , पोलिस निरीक्षक रविद्र शिंदे ,जांभुळपाडा सरपंच श्रध्दा कानडे ,उपसरपंच राजेश शिंगाडे ,माजी.सभापती भारती शेळके ,डॉ.दांडेकर ,अतिष खंडागळे ,महेश गिरी,जे.बी.पाटील,भास्कर शेळके ,माजी सरपंच मिलिंद बहाडकर ,यांच्यासह जांभुळपाडा ग्रामपंचायत सदस्य सह कर्मचारी,  शाळेचे विद्यार्थी ,ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget