अंधेरी पश्चिम परिसरातील 'पोस्ट हाऊस' स्टुडिओचे अनधिकृत बांधकाम निष्कासित सत्यदेव प्लाझा इमारतीच्या तळघरात सुरु होता रेकॉर्डिंग स्टुडिओ मुंबई पोलीसांच्या सहकार्याने 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई   मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) –      पालिका क्षेत्रातील अंधेरी पश्चिम परिसरातील वीरा देसाई मार्गालगत 'सत्यदेव प्लाझा' ही इमारत आहे. या इमारतीच्या तळघरामध्ये अनधिकृतरित्या 'पोस्ट हाऊस' नावाचा एक 'रेकॉर्डिंग स्टुडिओ' सुरु होता. इमारतीच्या मान्यताप्राप्त आराखड्यानुसार सदर जागेचा वापर 'स्टोरेज' साठी होणे अपेक्षित होते. मात्र, याठिकाणी साऊंड रेकॉर्डिंग, ऍनिमेशन, व्हीएफएक्स, व्हिज्यूअल प्रोमोज, ओडिओ-व्हिडिओ एडिटिंग यासारख्या कामांसाठी सदर जागेचा वापर अनधिकृतपणे केला जात होता. याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे गेल्यावर्षीच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांद्वारे न्यायालयीन स्थगिती प्राप्त करण्यात आली होती. या अनुषंगाने उच्च न्यायालयाने नुकतीच सदर स्थगिती उठविल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम मुंबई पोलीसांच्या सहकार्याने तोडण्यात आले आहे, अशी माहिती 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या तोडकाम कारवाई दरम्यान सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या जागेत अनधिकृतपणे सुरु असलेला 'पोस्ट हाऊस' रेकॉर्डिंग स्टुडिओ निष्कासित करण्यात आला आहे. या निष्कासन कारवाईसाठी पालिकेचे १५ कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तर मुंबई पोलीस दलातील १० पोलीसांचा ताफा देखील या कारवाई दरम्यान घटनास्थळी तैनात हेाता. ही कारवाई तळघरात करावयाची असल्याने या ठिकाणी जेसीबी, इलेक्ट्रीक कटर यासारख्या साधनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे हातोडा, छिन्नी, कुदळ इत्यादी पारंपारिक साधनांचा वापर करुन हे बांधकाम तोडण्यात

अंधेरी पश्चिम परिसरातील 'पोस्ट हाऊस' स्टुडिओचे अनधिकृत बांधकाम निष्कासित

सत्यदेव प्लाझा इमारतीच्या तळघरात सुरु होता रेकॉर्डिंग स्टुडिओ

मुंबई पोलीसांच्या सहकार्याने 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई

  मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) –      पालिका क्षेत्रातील अंधेरी पश्चिम परिसरातील वीरा देसाई मार्गालगत 'सत्यदेव प्लाझा' ही इमारत आहे. या इमारतीच्या तळघरामध्ये अनधिकृतरित्या 'पोस्ट हाऊस' नावाचा एक 'रेकॉर्डिंग स्टुडिओ' सुरु होता. इमारतीच्या मान्यताप्राप्त आराखड्यानुसार सदर जागेचा वापर 'स्टोरेज' साठी होणे अपेक्षित होते. मात्र, याठिकाणी साऊंड रेकॉर्डिंग, ऍनिमेशन, व्हीएफएक्स, व्हिज्यूअल प्रोमोज, ओडिओ-व्हिडिओ एडिटिंग यासारख्या कामांसाठी सदर जागेचा वापर अनधिकृतपणे केला जात होता. याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे गेल्यावर्षीच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांद्वारे न्यायालयीन स्थगिती प्राप्त करण्यात आली होती. या अनुषंगाने उच्च न्यायालयाने नुकतीच सदर स्थगिती उठविल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम मुंबई पोलीसांच्या सहकार्याने तोडण्यात आले आहे, अशी माहिती 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या तोडकाम कारवाई दरम्यान सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या जागेत अनधिकृतपणे सुरु असलेला 'पोस्ट हाऊस' रेकॉर्डिंग स्टुडिओ निष्कासित करण्यात आला आहे. या निष्कासन कारवाईसाठी पालिकेचे १५ कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तर मुंबई पोलीस दलातील १० पोलीसांचा ताफा देखील या कारवाई दरम्यान घटनास्थळी तैनात हेाता. ही कारवाई तळघरात करावयाची असल्याने या ठिकाणी जेसीबी, इलेक्ट्रीक कटर यासारख्या साधनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे हातोडा, छिन्नी, कुदळ इत्यादी पारंपारिक साधनांचा वापर करुन हे बांधकाम तोडण्यात 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget