मुंबईचा विकास करण्‍यासाठी आम्‍ही सदैवमुंबईचा विकास करण्‍यासाठी आम्‍ही सदैव कटीबध्‍द -महापौर

मुंबईचा विकास करण्‍यासाठी आम्‍ही सदैवमुंबईचा विकास करण्‍यासाठी आम्‍ही सदैव कटीबध्‍द -महापौर

मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह नूतनीकरण कामाचा महापौरांच्‍या हस्‍ते  शुभारंभ

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –   आमची बांधिलकी ही जनतेशी असून नागरिकांना दर्जेदार सेवा- सुविधा देणे तसेच मुंबईचा सर्वांगीण विकास करणे यासाठी आम्‍ही सदैव कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह नूतनीकरण कामाचा शुभारंभ  महापौरांच्‍या हस्‍ते आज गुरुवारी  दुपारी पार पडला त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी स्‍थानिक आमदार राम कदम,  सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव,  एन  प्रभाग समिती अध्‍यक्षा श्रीम. रुपाली आवळे,  महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीम.स्मिता गावकर,  नगरसेविका सर्वश्रीम.स्‍नेहल मोरे,  रोहिणी कांबळे,  समिक्षा सक्रे,  अश्विनी हांडे,  नगरसेवक सर्वश्री. परमेश्‍वर कदम,  सुर्यकांत गवळी,  उप आयुक्‍त (सार्व‍जनिक आरोग्‍य)  सुनिल धामणे,  कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते महापौर  बोलताना पुढे म्‍हणाले  गत अनेक वर्षापासून बंद असलेले हे प्रसुतीगृह सुरु होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव यांनी सातत्‍याने प्रयत्‍न केले.यासाठी वेळावेळी त्‍यांनी सभागृहात हा विषय मांडला. त्‍यांच्‍या पाठपुराव्‍यामुळेच आज नूतनीकरण कामाचा शुभारंभ होत असल्‍याचे महापौरांनी सांगितले.त्‍यासोबतच याठिकाणी नव्‍याने एनआयसीयु सुध्‍दा सुरु करावे अशी सूचना  उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) यांना केली असून त्‍यांनी याठिकाणी एनआयसीयु सुरु करण्‍याला होकार दिला असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिक उपस्थित होते स्‍थानिक आमदार राम कदम यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले आज याठिकाणी आपण सर्वजण चांगले काम करण्‍यासाठी जमले असून नागरिकांनी आरोग्‍यासंबंधी काही प्रश्‍न असतील काही मदत हवी असेल तर कधीही माझ्याकडे यावे अशी त्‍यांनी नागरिकांना सूचना केली. त्‍याचप्रमाणे या प्रसुतीगृहात आणखी चांगल्‍या सेवा –सुविधा देण्‍यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून प्रयत्‍न करुया,  असेही ते म्‍हणाले. तसेच जो कंत्राटदार नूतनीकरणाचे काम करणार आहे  त्‍याने चांगले दर्जेदार काम करावे अशी सूचनाही त्‍यांनी शेवटी केली. सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या  स्‍थानिक नागरिकांच्‍या पाठीब्‍याने व आर्शिवादाने  आज हे शक्‍य झाले असून यासाठी २०१३ पासून माजी नगरसेवक संजय भालेराव प्रयत्‍नरत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष असताना आज या कामाचा शुभारंभ होत आहे हा दुग्‍धशर्करा योग असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचबरोबर या प्रसुतीगृहामध्‍ये आणखी सेवा –सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍नरत राहणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.  उप आयुक्‍त (सार्व‍जनिक आरोग्‍य) सुनिल धामणे यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. चोवीस महिन्‍याच्‍या कालावधीत हे काम पूर्ण करणार असून याठिकाणी दवाखाना प्रसुतीगृह तसेच एनआयसीयु सुरु करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कटीबध्‍द -महापौर
मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह नूतनीकरण कामाचा महापौरांच्‍या हस्‍ते  शुभारंभ

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –   आमची बांधिलकी ही जनतेशी असून नागरिकांना दर्जेदार सेवा- सुविधा देणे तसेच मुंबईचा सर्वांगीण विकास करणे यासाठी आम्‍ही सदैव कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह नूतनीकरण कामाचा शुभारंभ  महापौरांच्‍या हस्‍ते आज गुरुवारी  दुपारी पार पडला त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी स्‍थानिक आमदार राम कदम,  सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव,  एन  प्रभाग समिती अध्‍यक्षा श्रीम. रुपाली आवळे,  महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीम.स्मिता गावकर,  नगरसेविका सर्वश्रीम.स्‍नेहल मोरे,  रोहिणी कांबळे,  समिक्षा सक्रे,  अश्विनी हांडे,  नगरसेवक सर्वश्री. परमेश्‍वर कदम,  सुर्यकांत गवळी,  उप आयुक्‍त (सार्व‍जनिक आरोग्‍य)  सुनिल धामणे,  कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते महापौर  बोलताना पुढे म्‍हणाले  गत अनेक वर्षापासून बंद असलेले हे प्रसुतीगृह सुरु होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव यांनी सातत्‍याने प्रयत्‍न केले.यासाठी वेळावेळी त्‍यांनी सभागृहात हा विषय मांडला. त्‍यांच्‍या पाठपुराव्‍यामुळेच आज नूतनीकरण कामाचा शुभारंभ होत असल्‍याचे महापौरांनी सांगितले.त्‍यासोबतच याठिकाणी नव्‍याने एनआयसीयु सुध्‍दा सुरु करावे अशी सूचना  उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) यांना केली असून त्‍यांनी याठिकाणी एनआयसीयु सुरु करण्‍याला होकार दिला असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिक उपस्थित होते स्‍थानिक आमदार राम कदम यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले आज याठिकाणी आपण सर्वजण चांगले काम करण्‍यासाठी जमले असून नागरिकांनी आरोग्‍यासंबंधी काही प्रश्‍न असतील काही मदत हवी असेल तर कधीही माझ्याकडे यावे अशी त्‍यांनी नागरिकांना सूचना केली. त्‍याचप्रमाणे या प्रसुतीगृहात आणखी चांगल्‍या सेवा –सुविधा देण्‍यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून प्रयत्‍न करुया,  असेही ते म्‍हणाले. तसेच जो कंत्राटदार नूतनीकरणाचे काम करणार आहे  त्‍याने चांगले दर्जेदार काम करावे अशी सूचनाही त्‍यांनी शेवटी केली. सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका डॉ. (श्रीम.) अर्चना भालेराव यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या  स्‍थानिक नागरिकांच्‍या पाठीब्‍याने व आर्शिवादाने  आज हे शक्‍य झाले असून यासाठी २०१३ पासून माजी नगरसेवक संजय भालेराव प्रयत्‍नरत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष असताना आज या कामाचा शुभारंभ होत आहे हा दुग्‍धशर्करा योग असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचबरोबर या प्रसुतीगृहामध्‍ये आणखी सेवा –सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍नरत राहणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.  उप आयुक्‍त (सार्व‍जनिक आरोग्‍य) सुनिल धामणे यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. चोवीस महिन्‍याच्‍या कालावधीत हे काम पूर्ण करणार असून याठिकाणी दवाखाना प्रसुतीगृह तसेच एनआयसीयु सुरु करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget