बृहन्मुंबई मंजूर 'विकास आराखडा-२०३४' नुसार शहर भागाचे नकाशे संकेतस्थळावर नकाशांची प्रत पालिका मुख्यालयातील सभागृह क्र. ३ मध्येही उपलब्ध नकाशांच्या अनुषंगाने सूचना व हरकती ५ ऑगस्ट पर्यंत नोंदविता येणार

बृहन्मुंबई मंजूर 'विकास आराखडा-२०३४' नुसार शहर भागाचे नकाशे संकेतस्थळावर
नकाशांची प्रत पालिका मुख्यालयातील सभागृह क्र. ३ मध्येही उपलब्ध
नकाशांच्या अनुषंगाने सूचना व हरकती ५ ऑगस्ट पर्यंत नोंदविता येणार
  मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – 'महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६' च्या तरतूदीन्वये बृहन्मुंबई मंजूर विकास आराखडा - २०३४ आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली - २०३४ या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे पालिकेस प्राप्त झालेले मुंबई शहर भागाचे नकाशे जनतेच्या माहितीसाठी व अवलोकनार्थ portal.mcgm.gov.in व www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदरहू आराखड्यातील सारभूत बदलांच्या नकाशांबाबत सूचना व हरकती या ५ ऑगस्ट २०१८ पर्यंत राज्य शासनाच्या अखत्यारितील नगररचना खात्याच्या उपसंचालकांकडे नोंदवावयाच्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता श्री. संजय दराडे यांनी दिली आहे.
'महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६' च्या तरतूद "मुंबई शहर व उपनगरांचा विकास आराखडा (२०३४), विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली (२०३४)'' यास ८ मे २०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे सारभूत स्वरुपाचे बदल वगळून मंजूरी देण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. १३ – २३ मे २०१८ च्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरहू आराखड्यातील सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांच्या अनुषंगाने सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने  ८ मे २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेबाबत  २२ जून २०१८ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार सदर आराखड्यातील मंजूर भाग  १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात येईल. तसेच राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेबाबत २९ जून २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे शुद्धीपत्रक व पूरकपत्रक जारी केले आहे. ही अधिसूचना देखील पालिकच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पालिका क्षेत्रातील शहर भागात ९ प्रशासकीय विभाग आहेत. ज्यामध्ये ए, बी, सी, डी, इ, एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण यांचा समावेश आहे. या ९ विभागांशी संबंधित एकूण ३४ नकाशे हे पालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील सभागृह क्र. ३ मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या कालावधी दरम्यान बघण्यासाठी उपलब्ध आहेत. हे नकाशे दि. ५ जुलै २०१८ पासून पालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नकाशांच्या अनुषंगाने सूचना व हरकती या ५ ऑगस्ट २०१८ पर्यंत मांडता येणार आहेत. सदर सूचना व हरकती या 'उपसंचालक, नगररचना, बृहन्मुंबई, ई ब्लॉक, इएनएसए हटमेंट, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई – १' यांच्या कार्यालयात सादर करावयाच्या आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget