महाड येथे शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर धडकला मोर्चा ग्राहकांच्या समस्या सोडवता येत नसेल तर खुर्च्या सोडा - बिपीन महामुणकर

महाड येथे शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर धडकला मोर्चा

ग्राहकांच्या समस्या सोडवता येत नसेल तर खुर्च्या सोडा - बिपीन महामुणकर

रायगड  :    महाड शहरासह तालुक्यात सातत्यानी विजेचाप्रवाह खंडित होत असून महावितरण कार्यालयाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने महाड शिवसेना, युवासेना पदाधिकारीचा महाड येथिल महाराष्ट्र विद्युत मंडळ यांच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा स्वरूपात महाड शिवसेना तालुका प्रमुख व पदाधिकारी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. ग्राहकांच्या समस्या सोडवता येत नसतील तर खुर्च्या सोडा असा सज्जड इशारा मोर्चे प्रमुख बिपीन महामुणकर यांनी दिला.

             या मोर्चाचे नेतृत्व उप जिल्हाप्रमुख बिपीन महामुणकर, तालुका प्रमुख सुरेश महाडिक,शहर प्रमुख दीपक सावंत,जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, मनोज कालीजकर,माजी राजिप उपाध्यक्ष बाळ राऊळ, माजी राजिप सदस्य निलेश ताठरे, सुरेश कालगुडे, पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर, महाड नगर सेवक, महिला आघाडी, युवा सेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

           निवेदनात महाड शिवसेनेने केलेल्या मागणीमध्ये वाढती वीज बिले कमी करणे, जुने पोल बदलून नवीन टाकणे ,नवीन मीटर चे पैसे भरून सूद्या मीटर न मिळणे,ग्राहकांच्या तक्रारी ची दखल न घेणे,आदी मागण्याचा समावेश करण्यात आला होता. उपस्थित मोरच्याकरांनी ताडाखेबाज ग्राहकांच्या समस्यांचा पाढा वाचल्यावर येत्या गणेश उत्सवा अगोदर जुने व गंजलेले पोल बदलण्यात येतील, नवीन मीटर लवकर बसवले जातील, महाड शहरातील धोकादायक डीपी हटवून योग्य ठिकाणी बसविण्यात येतील, महावितरण उपविभाग महाड मध्ये ग्राहक 54816 असून कार्यरत कर्मचारी केवळ 51 आहेत, 47 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात असे मोर्चेकरी पदाधिकाऱ्यांना उप अभियंता मांडोले यांनी उत्तर दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget