हजार ८७० टायर्स ३ लाख ८४ हजार ९७७ इतर वस्तू देखील हटविल्या साचलेल्या चमचाभर पाण्यात होतात डेंगी, मलेरियाचे शेकडो डास.

हजार ८७० टायर्स
३लाख ८४ हजार ९७७ इतर वस्तू देखील हटविल्या
साचलेल्या चमचाभर पाण्यात होतात डेंगी, मलेरियाचे शेकडो डास.

बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास; हे डेंगी (Dengue), हिवताप (Maleria) यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्याचमुळे पाणी साचू शकेल, अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. याच अनुषंगाने महापालिकेने १ जानेवारी ते ३० जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ८७० टायर्स हटविले असून ३ लाख ८४ हजार ९७७ एवढ्या छोट्या - मोठ्या पाणी साचू शकणा-या इतर वस्तूही हटविल्या आहेत. नागरिकांनी देखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक विभागास सहाय्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी श्री. राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणा-या `एडीस इजिप्टाय' (Aedes aegypti) डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या बाबतीत मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणा-या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' (Anopheles Stephensi) डासाची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंगी व मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून येतात. हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या व कार्यालयाच्या परिसराभोवती पाणी साचू शकेल अशी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे.

साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. हे लक्षात घेता, दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या सोसायटीच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अंतर्गत आपल्या सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा नियमितपणे तपासणी करुन तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करुन घेणे, पाणी साचलेले आढळून आल्यास ते काढून टाकणे वा नष्ट करणे; अत्यंत आवश्यक आहे.

साचलेल्या काही थेंब पाण्यातही डास अंडी घालतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी देखील विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य तितक्या लवकर नष्ट करुन महापालिकेला सहकार्य करावे. त्याचबरोबर अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंगी आजार पसरविणा-या डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्यची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी पाण्याचे पिंप वा पाणी साठवण्याची इतर भांडी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने पुसत असतांना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.

महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात तपासणी करुन टायर्स व पाणी साचतील अशा इतर वस्तू शोधून हटविण्यात येत असतात. यानुसार गेल्या ६ महिन्यात करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान महापालिकेच्या 'के पूर्व' विभागात सर्वाधिक म्हणजे १,४९३ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल 'आर उत्तर' विभागातून १,२४८ व 'एल' विभागातून १,२११ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून १० हजार ८७० टायर्स हटविण्यात आले आहेत.

टायर्स व्यतिरिक्त पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, अशा इतर वस्तू देखील महापालिकेद्वारे हटविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या वस्तुंचा समावेश आहे. याअंतर्गत गेल्या ६ महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४० हजार ५१२ वस्तू महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल २८ हजार ४७१ वस्तू 'डी' विभागातून, तर २३ हजार ९९१ वस्तू या 'जी उत्तर' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व २४ विभागातून ३ लाख ८४ हजार ९७७ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत, अशीही माहिती श्री. नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

कीटकनाशक विभागाद्वारे डेंगी व मलेरिया विषयक प्रतिबंधाबाबत महापालिकेद्वारे सर्वस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गत १ जानेवारी ते ३० जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत हटविण्यात आलेले टायर्स व इतर यांची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :

अनु. क्र.
परिमंडळ
विभाग
हटविण्यात आलेले टायर्स
हटविण्यात आलेले इतर साहित्य
1

एक

155
19163
2
बी
66
7647
3
सी
214
7254
4
डी
617
28471
5

650
17204
6

दोन
एफ /दक्षिण
240
27330
7
एफ /उत्तर
766
25112
8
जी /दक्षिण
328
40512
9
जी /उत्तर
244
23991
10

तीन
एच /पूर्व
605
10253
11
एच /पश्चिम
223
9454
12
के /पूर्व
1493
10608
13

चार
के /पश्चिम
122
10180
14
पी /दक्षिण
54
10894
15
पी /उत्तर
157
16111
16

पाच

एल
1211
19317
17
एम /पूर्व
933
17125
18
एम /पश्चिम
380
23966
19

सहा
एन
274
11499
20
एस
335
9696
21
टी
72
2730
22

सात
आर /दक्षिण
159
10310
23
आर /मध्य
324
18377
24
आर /उत्तर
1248


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget