*दि.१० जुलै२०१८*


सोमवार दि.०९ जुलै २०१८पासुन मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पाऊसामुळे, *वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले*  आहे. यामुळे  *खबरदारीचा उपाय योजना म्हणून* तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतुने सदर उच्च दाब वीज केंद्राचा *वीज पुरवठा सकाळी ०७.३०पासून बंद ठेवण्यात आला आहे.* त्यामुळे वसई गाव ,वसई प.,नालासाेपारा पु./प., आचोळे ,विरार प. ,जुचंद्र, नवघर पु., वालिव आगाशे, मनवेलपाडा, अनाळा , या भागातील विजपुरवठा खंडित आहे. *यामुळे महावितरणचे सुमारे ३लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.*

यातील काही भागाचा वीजपुरवठा हा अप्रिय घटना टाळण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. *महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.*

महावितरणचे ग्राहक गरजेनुसार 1912,  18001023435 व  18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

*या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण करत आहे.*

विश्वजीत भोसले
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी(प्रभारी)
कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget