आषाढी वारीसाठी मंगळवेढा आगाराकडून 71 गाड्यांची सोय आगाराने ठेवले 40 हजार कि.मी.चे उद्दीष्ठ ....!

आषाढी वारीसाठी मंगळवेढा आगाराकडून 71 गाड्यांची सोय 
आगाराने ठेवले 40 हजार कि.मी.चे उद्दीष्ठ ....!

प्रतिनिधी:
आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर मंगळवेढा आगाराने यंदा भाविकांच्या सोयीसाठी 71 गाड्यांची सोय करून 40 हजार कि.मी.चे उद्दीष्ठ ठेवले असल्याची माहिती आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी दिली.
दि.23 रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी भरत असल्याने राज्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी मंगळवेढा आगाराने दि.22 ते 24 जुलै दरम्यान यंदा 71 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवेढा ते गोपाळपूर पर्यंतच या बसेस धावणार आहेत. गोपाळपूर येथे गाड्या सोडण्यासाठी छोटे नियंत्रण कक्ष उभा करण्यात आले आहे. यासाठी 2 कार्यशाळा कर्मचारी व 4 वाहतूक नियंत्रक असे 6 कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. मंगळवेढा आगाराकडे केवळ 64 बसेस आहेत. त्यापैकी 4 बसेस डिव्हीजनला असतात. त्यामुळे 60 बसेसवर वाहतूक यंत्रणा चालते. वारीसाठी कोकणातून मंगळवेढा आगाराला यंदा 7 गाड्या चालक-वाहकासह मिळणार आहेत. गतवर्षी 5 गाड्या उपलब्ध झाल्या होत्या. दि.22 रोजी रविवार व आषाढी एकादशीदिवशी शासकीय सुट्टी येत असल्याने या दोन्ही दिवशी शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसेस वारीसाठी वापरल्या जाणार आहेत. पुणे, मुंबईकडे जाणार्‍या बसेस या कासेगावमार्गे जातील तर पंढरपूरमधील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक हे गोपाळपूर येथून उतरून पुढे जातील. रिंगण सोहळ्याप्रसंगी नातेपुते, शिंगणापूर अशा गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. गोपाळकाला झाल्यानंतर कर्नाटकातील भाविकांच्या परतीसाठीही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. मंगळवेढा बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पास काढताना ऊन, वारा, पाऊस याला सामना करावा लागू नये यासाठी येथे पत्र्याचे शेड उभे करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाच्या अभियंत्यांना सादर करण्यात आला आहे. बसस्थानक नव्याने उभारल्यानंतर रंगरंगोटी करण्यात आली होती. याला बरेच वर्षाचा कालावधी लोटल्याने बसस्थानकाचा रंग फिकट झाल्याने लवकरच बसस्थानकाला रंगरंगोटी करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget