मेट्रोच्या नावाखाली पालिकेने चक्क 6303 झाडाची केली कत्तल वृक्षप्राधिकरण समितीत पडसाद

मेट्रोच्या नावाखाली पालिकेने चक्क 6303 झाडाची केली कत्तल
वृक्षप्राधिकरण समितीत पडसाद
मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेने  मेट्रोच्या नावाखाली हजारो झाडाची कत्तल केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या बात आज मंगळवारी वृक्ष प्राधिकरण समितीत चांगलेच पडसाद उमटले भाजप वगळता सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाला धारेवर धरले पालिका प्रशासनाने मुंबई मेट्रोसाठी आतापर्यंत चक्क 6303 झाडांची कत्तल कत्तल केली आहे यामध्ये तोडण्याची मंजुरी घेतलेल्या 2801 झाडांव्यतिरिक्त आणखी 3503 झाडे तोडण्यात आली आहेत आतापर्यंत किती झाडे पुनर्रोपित केली आणि त्यापैकी किती जगली याचा अहवाल येत्या वृक्ष प्राधिकरण समितीत दया असा प्रवित्रा सदस्यांनी घेतला आहे त्यामुळे पालिका प्रशासनाची आता चांगलीच गोची झाली आहे
  पालिका दरवर्षी झाडे लावा आणि जगवा असा नारा देणारी मुंबई पालिकाच विविध प्रकल्प व मेट्रोच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल करत असल्याची बाब समोर आली आहे पालिकेने  एमएमआरसीकडून कुलाबा-वांद्रे-सिप्झ अशा 32.05 किमी मेट्रो 4 चे काम प्रगतिपथावर आहे. मात्र या मार्गात येणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला पालिकेकडून फक्त 2801 झाडे तोडण्याची मंजुरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर मेट्रो कडून वेळोवेळी कामासाठी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळवण्यात येते. त्यामुळे अशी अतिरिक्त झाडे तोडल्याचा आकडा तब्बल 3503 वर गेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि बाजार उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत ही बाब उघड केली. यावेळी पुन्हा 15 झाडे तोडण्यासाठी आलेला प्रस्तावही बहुमताने फेटाळून लावण्यात आला. मुंबईत असलेल्या 29 लाख75 हजार228 झाडांनुसार पाच माणसांमागे फक्त एक झाड आहे. कॅनडामध्ये हेच प्रमाण प्रतिमाणसामागे 8953 ब्राझिलमध्ये 1293 तर चीनमध्ये 1102 असे प्रमाण आहे. सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत मुंबईत प्रतिवर्षी सहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र यामध्ये लावलेली झाडे जगतात का? असा सवाल यशवंत जाधव यांनी केला. वन धोरणानुसार लोकवस्तीच्या 35 टक्के भाग हा झाडांनी व्यापलेला असावा. मात्र मुंबईतील हे प्रमाण केवळ वीस टक्के असल्याचे जाधव यांनी सांगितले तर
मे 2017 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रोने पालिकेकडून 2801 झाडे तोडण्यासाठी मंजुरी घेतली. त्यानंतर मेट्रोच्या 15 स्थानकांसाठी 214 झाडे तोडण्यात आली. आरे इलेक्‍ट्रिक टॉवर शिफिंगसाठी 137, आरे कारशेडसाठी 307, यार्डसाठी 54 अशी झाडे तोडण्यात आली. यानुसार मंजुरी घेतलेली 2801 तसेच अतिरिक्त 3426 तर मुंबई सेंट्रल येथील आणखी 76 अशी मिळून 6303 झाडे आतापर्यंत तोडण्यात आली आल्याची माहिती बाजार उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget