जागृत देवस्थान बाबदेवाच्या मंदिरात मद्याच्या नशेत असणाऱ्या तरुणाची गाडी घुसली ,मंदिराचे मोठे नुकसान गाडीतील तरुण जखमी      
प्रतिनिधी:खोपोली
        मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वीणेगाव हददीत असणारे जागृत देवस्थान बाबदेव मंदिरात अनेक जण नवस फेडण्यासाठी या ठिकाणीनेहमीच गर्दी असते मात्र सध्या पावसाळी पर्यातणांची झीक तरुणाई मध्ये असल्याने या महामार्गावरून सुसाट वेगात वाहने चालवीत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत रविवार हा दिवस पर्याटनाचा दिवस असल्याने उरण येथील तरुण खोपोली बाजू कडून उरणच्या दिशेने जात असताना गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी थेट मंदिरात घुसून मोठ्या प्रमाणात मंदिराचे नुकसान केले आहे यात गाडीतील तरुण काही प्रमाणात जखमी झाल्याची घटना रविवारी 4. 45 वाजण्याच्या दरम्यान गळी आहे.
         याबाबत मिळालेली माहिती अशी की मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून उरण येथील आठ तरुण खोपोली बाजू कडून मध्याच्या नशेत असताना झायलो क्रमांक एम. एच. 43 ए. एक्स 641 हिने सुसाट वेगात खोपोली बाजूकडून जात असताना वीणेगाव हदीतीतलं जागृत देवस्थान बाबदेव मंदीरारा जवळ आल्यावेळी चालकाचा ताबा सुरल्याने गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरून मंदिरात घासल्याने मोठ्याप्रमाणात मंदिराचे नुकसान झाले आहे या अपघातात यातील तरुणवर्ग किरकोळ जखमी झाले असून या सर्वाना खालापूर पोलिसांनी उपचारासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. अपघातातनंतर मात्र या तरुण वर्गाला आपली गाडी कुठे घुसली आहे याचे भानच नसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त करीत होते.मात्र सुदैवाने या ठिकाणी बाबदेव मंदिरात नवस फेडण्यासाठी नागरिकांनी गर्दी नव्हती अन्यथा मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget