मुंबईत आता पालिकेच्या 35 शाळा होणार आंतरराष्ट्रीय पालिका शिक्षण समितीपुढे प्रस्ताव


मुंबईत आता पालिकेच्या 35 शाळा होणार आंतरराष्ट्रीय
    पालिका  शिक्षण समितीपुढे प्रस्ताव

मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या मुंबईत आता 35 शाळा आंतरराष्ट्रीय होणार आहेत तसा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे वेळोवेळी पालकांकडून होणारी आंतरराष्ट्रीय शाळांची वाढती मागणी आणि इंग्रजीकडे असलेला कल लक्षात घेऊन  मुंबईत या आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जाणार आहेत. दहावीपर्यंतच्या या नवीन शाळा खासगी सहभागातून सुरू करण्यात येणार आहेत
मुंबई पालिका ही आठ भाषेतून लाखो विद्यार्थीना शिक्षण देत आहे यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे असे असताना सुद्धा पालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. विद्यार्थी गळती वाढल्याने अनेक शाळा बंद पडल्या, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने सार्वजनिक-खासगी सहभागाने (पीपीपी) शिशूवर्ग ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. या शाळांमध्ये खासगी संस्थांचे शिक्षक शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणाऱ्या मोफत वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातील. गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे.
पालिकेच्या काही शाळांमध्ये जागेअभावी आठवी ते दहावीचे वर्ग भरत नाहीत. हे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याने माध्यमिक शिक्षण बाहेरून घेणे परवडत नाही. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर सुरू होणाऱ्या शाळांत दहावीपर्यंतचे सलग शिक्षण मिळावे यासाठी योग्य उपाययोजनांची गरज आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका  सईदा खान यांनी दिली आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget