मुंबईच्या रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रर-त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे वारे अजूनही चांगलेच वाजत आहेत आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरत पालिकेला सळो की पळो करून सोडले खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्‍स'चा तुटवडा असताना पालिकेने 300 टन कोल्डमिक्‍स पुरविल्याचा दावा केला आहे. हा दावा खोटा असून कोल्डमिक्‍सची चोवीस विभागांचे सहाय्यक आयुक्त वाट पहात आहेत ज्या ठिकाणी कोल्डमिक्‍स वापरले ते फेल ठरल्याने हे तंत्रज्ञान त्वरीत रद्द करा, दुसऱ्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे तातडीने बुजवा अशा मागण्या लावून धरल्या

मुंबईतील रर-त्यांसाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे पण पहिल्याच पावसात रर-त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे सामाज्य दिसत आहे मुंबईकर दरवर्षी या त्रासाला सामोरे जात आहेत यंदाही तीच परिस्थिती आहे   मुंबईतील सर्वच रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. ते बुजविण्यासाठी वापरलेले "कोल्डमिक्‍स' तंत्रज्ञान सपशेल फेल ठरले आहे. खड्डे बुजविल्याची प्रशासन देत असलेली आकडेवारी ही केवळ धुळफेक मुबईकरांची दिशाभूल करणारी असून कोल्डमिक्‍सचा पूनर्विचार करावा आणि खड्‌डे तातडीने बुजवावेत अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्‌द्‌याद्वारे केली. खड्डे तातडीने बुजले नाहीत तर अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खड्ड्यांवरून आज बुधवारी बैठकीत वादळ उठले. 80 टक्के हमी कालावधीतील रस्ते असताना रस्त्यांवर खड्डे पडतातच कसे, असा सवाल कॉंग्रेसचे असिफ झकेरिया यांनी करीत वरळीला असलेला कोल्डमिक्‍स प्लांट चालविणारा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट कंत्राटदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदराना कोल्डमिक्‍स आणि हॉटमिक्‍स वापरण्याची मुभा असेल तर कोल्डमिक्‍सचा आग्रह प्रशासन का धरीत आहे, वॉर्डांना प्रत्येकी 15 टन या प्रमाणे सर्व वॉर्डांना 300 टन कोल्डमिक्‍स दिले असेल तर ते गेले कुठे? असा असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. हॉटमिक्‍स किंवा कोणतेही तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवा अशी मागणी त्यांनी केली. खड्ड्यांची खोटी आकडेवारी देवून फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली. सपाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आदींनी प्रशासनाचा समाचार घेतला. फेल ठरलेले तंत्रज्ञान रद्द करा आणि रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवा असे निर्देश समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. येत्या शनिवारी कोल्डमिक्‍स प्लॉंटची पाहणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 340 मेट्रीक टन कोल्डमिक्‍स तयार केले. त्यापैकी 300 मेट्रीक टन कोल्डमिक्‍स सर्व वॉर्डांना पाठविले आहे. प्रत्येक झोनसाठी दोन कंत्राटदार नेमले आहेत. जबाबदारीने काम करणार नाही अशा कंत्राटदारांना पाठीशी घालणार नाही. त्यांच्याविरूध्द कारवाई करू. चुकीचे काम केले असेल अशा  कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करू.अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget