पोलादपूर- महाबळेश्वर आंबे घाटात खाजगी प्रवासी बस 200 फूट दरीत कोसळली,

पोलादपूर - महाबळेश्वर आंबे घाटात खाजगी प्रवासी बस 200 फूट दरीत कोसळली,
रत्नागिरी---
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात एक खासगी बस २०० फूट दरीत कोसळून आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आलं आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३८ कर्मचारी आणि २ चालक-वाहक असे एकूण ४० जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.

आंबेनळी घाटामध्ये धुकं मोठ्या प्रमाणावर असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget