मुंबईतील गणेश मंडळांना आता मिळणार ऑनलाईन परवानग्या 15 जुलैपासून अर्ज भरता येणार

Mumbaiमुंबईतील गणेश मंडळांना आता मिळणार ऑनलाईन परवानग्या

15 जुलैपासून अर्ज भरता येणार

मुंबई ( प्रतिनिधी ) – वषाॅतील सवाॅत मोठा सन असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचे वारे वाजू लागले आहेत मुंबईकरांची धावपळ सुरू झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदापासून ऑनलाईन परवानग्या देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे  त्यामुळे आता गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या मिळणार आहेत यासाठी मंडळांना 15 जुलैपासून अर्ज भरता येणार आहेत.
पालिका मुख्यालयात आज शनिवारी मुंबईतील गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या आणि रर-ते कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला गणपती बाप्पाचा सन आला की सवाॅचीच मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू होते गणेश मूर्ती करानी जोरात काम सुरू केले आहे पालिका प्रशासनाचीही धावपळ सुरू झाली आहे अर्ज भरताना गणेशोत्सव मंडपाचा आकार, रस्त्यासंबंधीच्या बाबी यासंदर्भात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींनुसार परवानग्या दिल्या जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 15 जुलैपासून संबंधित परवानग्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिसांची "ना-हरकत' मिळताच मंडळांना पालिकेद्वारे परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देण्याबाबत विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना योग्य माहिती व्हावी यासाठी पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तसेच  या बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 'झिरो टॉलरन्स फॉर पॉटहोल' रस्ते कामांविषयक नवीन कडक भुमिका घेतली आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. हा अनुभव लक्षात घेवून रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता वाढावी तसेच रस्त्यांत खड्डे पडू नयेत यासाठी गेल्या तीन वर्षात उपाययोजना केल्या आहेत. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार रस्त्यांना प्राधान्यक्रम दिल्याची माहिती पालिकेने दिली आहे तसेच नव्या धोरणानुसार यंदा रस्त्यांबाबत सकारात्मक परिणाम दिसून आल्याबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे परिणामी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे फारसे आढळून आलेले नाही असा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, काही ठिकाणी खड्डे उद्भवल्यास त्यामागची कारणे काय आहेत? तेथे चर खोदले आहेत काय, कंत्राटदारांने योग्य रित्या काम केले नाही काय याचा शोध घेतला जाणार आहे. त्याबाबतचा आढावा अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आणि संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) हे घेतील तसे 

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget