पालिका क्षेत्रातील विक्री प्रक्षेत्रांबाबत मागविल्या सूचना, अंतिम तारीख १९ डिसेंबर

Primary
पालिका क्षेत्रातील विक्री प्रक्षेत्रांबाबत मागविल्या सूचना
Sunil tarfe
to me
26 minutes ago
Details

२००७ मध्ये करण्यात आली होती २२ हजार ९७ विक्री प्रक्षेत्रांची निश्चिती
संकेतस्थळावरील यादी बाबत सूचना पाठविण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –   पदपथ विक्रेते (उपजिविका संरक्षण आणि पदपथांवरील विक्रीचे विनियमन) अधिनियम २०१४ मधील विविध तरीतूदींनुसार महाराष्ट्र शासनाद्वारे पथ विक्रेता योजना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत जुलै २०१४ मध्ये करण्यात आलेल्या पदपथ विक्रेत्यांचे सर्वेक्षणादरम्यान ९९ हजार ४३५ अर्ज प्राप्त झाले होते. यानुसार विक्रेत्यांची नोंदणी व प्रमाणपत्रे वितरित करण्यासह व्यवसाय करण्याच्यादृष्टीने विक्री प्रक्षेत्रे (पिचेस) विकसित करणे आवश्यक आहे. याबाबत सर्वेाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व २४ विभागातील २२ हजार ९७ पिचेसला मान्यता देण्यात आली आहे. तथापि, या प्रक्षेत्रांच्या निश्चितीची कार्यवाही ही वर्ष २००७ मध्ये केलेली असल्याने याबाबत नागरिकांच्या तसेच स्थानिकांच्या हरकती / सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी त्यांच्या सूचना वा हरकती येत्या १८ डिसेंबर २०१७ पर्यंत महापालिकेकडे इमेलद्वारे पाठवावयाच्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षक शरद बांडे यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget