बेस्ट बस मार्गात झाले बदल


मुंबई  ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टने  येत्या एक डिसेम्बरपासून प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या  बस प्रवर्तनात बदल केलेत. काही बसमार्गांवरील बसफेरीत वाढ करण्यात आलीय. काही बसमार्गांच्या  गंतव्यस्थानात बदल केला आहे .
बस मार्गातील बदल
बसमार्ग क्र १७२ वर प्लाझा ते प्रतीक्षा नगर दरम्यान, बस क्र २९७ वर बोरिवली स्थानक पूर्व ते मिनी नगर दरम्यान . बस क्र  ३१२ वर प्रतीक्षा नगर ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान व बस क्र ३३३ वर अंधेरी स्थानक पूर्व ते महाकाली गुंफा दरम्यान अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.

वांद्रे रिक्लेमेशन बस स्थानक ते शेर्लि गांव दरम्यान बस क्र २२० जादा क्रमांकाची बस चालविण्यात येणार असून २२० चा नवीन जादा  पॅटर्न खार स्थानक पश्चिम ते पोलीस अधीक्षक कार्यालय दरम्यान चालविण्यात येईल.

वांद्रे पूर्व बस स्थानक ते म्हाडा वसाहत मुलुंड दरम्यान धावणारी बस क्र ३०३ वांद्रे टर्मिनस पूर्व पर्यंत जाईल. 

सांताकृझ स्थानक [ पूर्व ] ते अमर ब्रास स्टिल कंपनी पर्यंत जाणारी ३१३ जादा बस आता कुर्ला आगार पर्यंत जाईल.
  
कुलाबा बस स्थानक ते नाडकर्णी पार्क पर्यंत धावणारी बस क्र ९ आता अँटॉप हिल येथे खंडित करण्यात येईल.

बस क्र ४४ आता इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत न जाता म्युझियम पर्यंतच धावेल व ह्या बसचा विस्तार वरळी गांव पासून वरळी आगारापर्यंत केलेला आहे . बस क्र ४५ आता मंत्रालय येथून सुटून आदर्श नगर हुन आणिक आगाराकडे न जाता पूर्व मुक्त मार्गाने माहुल गांव पर्यंत धावेल . 

मुंबई सेंट्रल आगार ते विद्याविहार बस स्थानक दरम्यान धावणारी बस क्र ६२ आता प्लाझा ते विद्याविहार पर्यंत धावणार असून ही बस  टी जंक्शन , रहेजा व मच्छीमार नगर हुन जाण्याऐवजी माहीम कोळीवाडा मार्गे धावेल . बस क्र ३०२ प्रतीक्षा  नगर ते मुलुंड बस स्थानक ऐवजी राणी लक्ष्मी चौक ते मुलुंड दरम्यान  धावेल. 

घाटकोपर आगार ते लोकमान्य नगर ठाणे दरम्यान धावणारी ४९७ मर्यादित बस मुलुंड स्थानक पश्चिम ते लोकमान्य नगर दरम्यान धावेल.  बस क्र २५ मर्यादित आता दोन पॅटर्न  मध्ये धावणार असून बॅकबे आगार ते राणी लक्ष्मी चौक दरम्यान एक पॅटर्न व वडाळा  आगार ते विहार सरोवर दरम्यान दुसऱ्या पॅटर्न ची बस धावेल. बस क्र १८२ बंद करून हि बस राणी लक्ष्मी चौक ते मालवणी आगार दरम्यान धावणाऱ्या १८० मध्ये विलीनीकरण करण्यात येईल . 


सांताक्रूझ स्थानक पूर्व ते  विद्याविहार स्थानक पश्चिम दरम्यान धावणाऱ्या ४३३ बसचे बस क्र ३२२ मध्ये विलीनीकरण करण्यात येणार असून हि बस आता सांताक्रूझ स्थानक पूर्व ला वळसा घेऊनच महंत रोडला  जाईल . बस क्र २ मर्यादित दुपारी १ ते ४ दरम्यान   फक्त  वांद्रे पूर्व बस स्थानक पर्यंत धावेल . तर बस क्र १५६ वरील बस जाता येत ग्रॅन्ट रोड स्थानक मार्गे धावतील . 

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget