कांदिवलीतील पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर विजयी


मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  मुंबई पालिकेच्या कांदिवली येथील प्रभाग क्र २१ च्या पेाटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर या विजयी झाले आहेत. यांनी ७१२२ मते मिळवून विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले (मकवाणा) यांचा पराभव केलाय. या विजयामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या एकने वाढली असून आता ८३ झालीय.
भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्र २१ मध्ये पेाटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने त्यांच्या सून प्रतिभा गिरकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. आज झालेल्या मतमोजणीत प्रतिभा गिरकर यांच्या पारडयात ९५९१ मते तर काँग्रेसच्या निलम मधाळे (मकवाणा)यांना १९८४ मते मिळाली. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध असल्यामुळे गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार या पोटनिवडणूक असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठींबा दिला हेाता. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. पोटनिवडणुकीत २८.७५ टक्के इतके कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ६ हजार ६३१ पुरूष व ५ हजार १७३ स्त्रीया असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget