आता टेलिस्कोपिक रॉड करणार अग्निशमन दलाच्या जवानांचं रक्षण


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत आता पालिकेच्या 
अग्निशमन दलाच्या जवानांना  विजेच्या तारा,झाड आणि घरांच्या छतावर अडकणारे पक्षी काढण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागणार नाही आणि जवनांना  जिव धोक्‍यात घालण्याची गरज पडणार नाही. हे पक्षी काढण्यासाठी टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे
मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून ही नगरी 24 तास गजबजलेली असते या नगरीत कुठे आग , अडकलेले पक्षी लहान मोठ्या घटना घडल्या की आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान घटनानाचा सामना करून लोकांचा जीव वाचवत असतात.  मुंबई सेंट्रल येथे विजेच्या तारेला अडकलेला पक्षी काढताना शॉक लागल्याने उपचारादरम्यान गेल्या वर्षी अग्निशमन दलाचा जवान रविंद्र भोजणे यांचा मृत्य झाला होता. त्यापुर्वी अशाच काही दुर्घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने अग्निशमन दलाला पक्षी सोडविण्याचे काम दिले जाऊ नये अशी शिफारस केली होती. या शिफारशीला दिड वर्ष उलटून गेल्यानंतरही हे काम अग्निशमन जवान करत आहे. पक्ष्यांसाठी जवानांना जिव धोक्‍यात घालवावा लागत आहे. दरवर्षी तब्बल साडे चार हजार हून अधिक पक्षी जवान वाचवतात. मात्र,त्यासाठी स्वत:चा जिव धोक्‍यात घालवावा लागतो. अडकलेले पक्षी सोडविण्यासाठी जवनांना स्वत:चा जिव धोक्‍यात घालावा लागू नये म्हणून टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन दल 16.56 मिटर लांबीचे 35 रॉड विकत घेणार असून त्यासाठी 77 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रासाठी एक रॉड देण्यात येणार आहे. हे रॉड वजनाने हलके असल्याने ते हाताळणे शक्‍य होईल असा दावा करण्यात येत आहे.
  • शहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन

मुंबईत लोकांची संख्या वाढत आहे तशी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे या वाहतुक कोंडीमुळे अग्निशमन दलाचे मोठे बंब पोहचण्यात अनेक वेळा विलंब होतो. तसेच दाटीवाटीने वाढलेल्या झोपड्यांमधून जातानाही बंबांना अडथळे येतात.त्यासाठी शहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन उभारुन त्यांत लहान बंब वापरण्यात येणार आहे. त्यासाठी कंटेशनराईज्ड कार्यालय विकत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.या 17 कार्यालयांसाठी एक कोटी 96 लाख रुपये खर्च करणार आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget