तब्बल 2 वर्षांनंतर भायखाळा रेल्वे स्थानकावरील नवा पादचारी पूल खुला

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) –  मुंबईतील जुने आणि प्रसिद्ध असलेल्या भायखळा मार्केट येथील ब्रिटिशकालीन रेल्वे फुटओव्हर  पूल नव्याने बांधून पूर्ण झाला असून पालिकेकडून पादचाऱ्यांकरिता खुला करण्यात आला आहे. गेले दोन वर्ष सदर पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय या पुलाचे काम पूर्ण झाल्याने दूर झालीय. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पुलासाठी गेली दोन वर्ष तत्कालीन स्थानिक नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी पालिकेकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर पूल तयार होऊन जनतेसाठी वेळेत उपलब्ध झाला आहे.                                         
 मुंबईतील प्रसिद्ध भायखळा मार्केट येथील भायखळा पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पादचारी पूल अतिशय धोकादायक स्थितीत झाल्याने दोन वर्षांपूर्वी  पाडून टाकण्यात आला होता. सदर पूल बंद झाल्याने  तसेच नवीन पुलाच्या बांधकामास न्यायालयीत  आव्हान दिल्याने विलंब झाला . त्यामुळे या परिसरातील सुंदर गल्ली ,मदनपुरा,दगडीचाल,आग्रीपाडा , सातरस्ता, भायखळा मुस्तफा बाजार येथील नागरिकांना तसेच एन्झा स्कुल ,आणि  ग्लोरिया स्कुल या शाळेतील विद्याथ्यांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन तत्कालीन अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान ई वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन पालिकेने सादर ठिकाणी नव्याने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. आज गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्न्नांना यश येऊन येथील जनतेसाठी जनतेसाठी सादर पूल खुला करण्यात आला आहे. यामुळे गेले दोन वर्षांपासून येथील नागरिकांची तसेच विद्याथ्यांची गैरसोय दूर झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.  

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget