शशी बाला व अभियंता संजय निर्मळ 'ऑफीसर ऑफ द मंथ'



मुंबई ( प्रतिनिधी ) –  'इझ ऑफ डुइंग' अंतर्गत पालिका क्षेत्रात व्यवसायस्नेहीता वाढावी आणि नागरिकांना संबंधित परवानग्या, प्रमाणपत्रे इत्यादी सुलभपणे मिळाव्यात, यादृष्टीने पालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत असल्याचं पहायला मिळतेय. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आतापर्यंत दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानग्या, आरोग्य विषयक परवानग्या, ट्रेड लायसन्स, इव्हेंट परमीशन्सबाबत कॉमन बिझनेस ऍप्लीकेशन सुरु करण्यात आले आहे. हे करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या व्यवसाय विकास कक्षाच्या प्रमुख शशी बाला आणि विकास नियोजन खात्यातील सहाय्यक अभियंता संजय निर्मळ यांची 'नोव्हेंबर - २०१७' साठी 'ऑफीसर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आलीय.
पालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित पालिका अधिका-यांच्या मासिक बैठकी दरम्यान माननीय पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन शशी बाला आणि सहाय्यक अभियंता संजय निर्मळ यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  विजय सिंघल, अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्यासह पालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget