मेट्रो कारशेडनं घेतला 7 हजार 842 झाडाचा बळी


मुंबई ( प्रतिनिधी )  सध्या एक धक्कादायक बाब समोर येतेय. ती म्हणजे मुंबईत 2 वर्षात 7 हजार 842 झाडांची कत्तल करण्यात आलीय.  लोकांच्या सोयीसाठी सरकारनं आणलेल्या मेट्रो प्रकल्पानं या वृक्षांचा बळी घेतल्याचं म्हटलं जातंय.
पालिका वृक्ष प्राधिकरण समिती वृक्ष कापण्याच्या प्रस्तावा वरून सभा चांगलीच गाजतेय. सोमवारी  वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत आरेतील मेट्रोकारशेडसाठी ४४४ झाडांच्या तोडणीचा प्रस्तावरील चर्चेदरम्यान शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. यापुढे मनमानीपणे वृक्ष तोडणीचे प्रस्ताव मंजूर करू देणार नाही अशी भूमिका यावेळी शिवसेनेनं मांडली. मुंबईतील झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे शिवसेनेने आधीपासूनच झाडे तोडणीच्या प्रस्तावाला विरोध केल्याचं सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितलं. त्यामुळे आणखी ४४४ झाडांच्या तोडणीपूर्वी  महापौर  विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते आणि सर्वपक्षीय गटनेते यांचा संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. १० नोव्हेंबर रोजी हा दौरा होणार आहे. या ठिकाणी झाडांच्या तोडणीची खरोखरच आवश्यकता आहे का, याची पाहणीदेखील यावेळी केली जाणारय.
कापलेली झाडे परत लावली जात नाही. कारण झाडे कापण्यासाठी डिपॉझिट घेतले जाते, ते डिपॉझिट एकानेही आतापर्यंत परत घेतलेले नाही. यावरून स्पष्ट होते की झाडे परत लावली जात नाही, अशीही धधक्कादायक माहिती पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सोमवारी दिली

  • शिवसेनेच्या मागण्या

- पालिका प्रशासनाने वॉर्डनिहाय वृक्षांचे मोफत वाटप करावे
- वृक्ष संवर्धनासाठी वर्षातून चार वेळा प्रदर्शन भरवावे
- झाडांच्या तोडणीनंतर नवीन झाडे लावली जातात का, पुनर्रोपण होते का याचा पाहणी करावी
- झाडे तोडणीबाबत पर्यावरणवादी संघटनांना लक्ष घालण्याचे आवाहन


Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget