गोरेगावातील हुक्का पार्लरवर पोलिसांची धडक कारवाई

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लचा धंदा तेजीत चालतोय. अशा हुक्का पार्लरविरोधात शिवसेनेने आवाज उडवल्यानंतर पोलिसांनी गोरेगावमध्ये धडक कारवाई केलीय. यामध्ये ४ हुक्का पार्लरवर छापा मारून ते बंद करण्यात आलेत.  असा प्रकार पुन्हा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा  इशाराही पोलिसांनी दिलाय.  

गोरेगाव पश्चिम येथील एसव्ही रोडवरील रॉयल स्मोक हुक्का पार्लर इथं नुकतीच एका युवकाची हत्या झाली. या परिसरात वारंवार मारामारी व गुंडगिरीच्या घटना घडतात. यामुळे स्थानिकांना प्रचंड उपद्रवाचा सामना करवा  लागत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी  मोर्चा काढला. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत गेल्या दोन दिवसांत गोरेगाव पोलिसांकडून विभागात हुक्का पार्लरविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget