मुंबईकर धोक्यात, पाऊस नसताना मुंबापुरीत पडझडीच्या घटनांत वाढ

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याचे सत्रंच सुरू झालं आहे. पावसाळयात इमारत व भिंती पडण्याच्या घटना घडत असताना आता मात्र पाऊस नसतानाही पडझडीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होणे आश्चर्याटी बाब आहे. सुरुच  कुर्ला येथे एका इमारतीच्या खोलीच्या प्लास्टरचा भाग पडून ४  जण जखमी झाले तर सांताक्रूझ येथील जुहूतारा रोडवर झाड कोसळल्याने २ जण जायबंदी झाले आहेत. असे ऐकून सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे .
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या मुंबापुरीत मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभे आहेत मात्र पाऊस नसतानाही पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरवर्षी पावसाळ्यात झाडे तसेच झाडांच्या फाद्यां कोसळण्याच्या घटना घडतात.तसेच घरे भिंतीचा भागही पडण्याचा घटना घडतात.मुंबईत सध्या पाऊस नाही मात्र पडझडीच्या घटना सुरूच आहेत विशेषतः झाडे उन्मळून पडणे झाडांच्या फाद्यां कोसळणे सातत्याने सुरूच आहे . त्याचप्रमाणे शॉर्टसर्किटच्या तक्रारीही सतत येत आहेत . काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुर्ला पश्चिम हलावपुल ,माकडवाला कम्पाउंड येथील साई शंकर चाळ या तळ मजला अधिक एक मजला असे बांधकाम असलेल्या इमारतीच्या खोली क्रमांक ३च्या अँगल व प्लास्टरचा  भाग पडला या घटने४ जण जखमी झाले .त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले .नसरीन खान(३२) , रुकसाना खान (२९) ,दानिश खान (१५) व शहाबाद खान (३) अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत. 

२४ तासांत ८ शॉर्टसर्किटच्या दुर्घटना
९ ठिकाणी झाडे, झाडांच्या फाद्यां पडण्याचा तक्रारी
सांताक्रूझ पश्चिम, जुहूतारा रोड येथील मानीकजी  कूपर शाळेसमोर काल सायंकाळी झाड कोसळल्याने २ जणांना दुखापत झाली. आनंद कनोजिया (३६) व जितेश परदेशी (३१) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 
दरम्यानशनिवारी चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत झाड पडल्याने ३ महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अशीच घटना घडल्याने मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget