इमारत बांधकामासाठी पालिकेने केली शुल्कात 25 टक्के वाढ

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेने इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्याच्या शुल्कात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.  पालिका बिल्डरांना विकास कामांची परवानगी देण्यासाठी तसेच विकास हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी ठराविक शुल्क वसुल करते. या शुल्कात 2009 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता 25 टक्के शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती पुढे सादर केलाय. त्याच बरोबर या शुल्कात दरवर्षी 10 टक्के वाढ करण्याची शिफारशीही केली आहे पालिका स्थायी समितीने मंजूरी दिल्यानंतर तत्काळ ही शुल्कवाढ लागू होणारेय... या प्रस्तावाला स्थायी समितीची परवानगी मिळाल्यास भविष्यात शुल्क वाढ करण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. 

अशी असेल  वाढ 

या वर्षी शिफारक करण्यात आलेली 25 टक्के वाढीचा तक्ता.
दरवर्षी 10 टक्के शुल्कवाढ होणार. 
सध्याचे शुल्क-25 टक्के वाढीचे शुल्क 
सर्व आरक्षणांच्या बाबतीत विकास हक्क प्रमाणपत्र --- किमान 5000 सह प्रती चौरस मिटर 38 रुपये - किमान 6530 सह प्रती चौरस मिटर 48 रुपये 
समायोजन आरक्षणातील भुखंड - किमान 4500 किंवा सह चौरस मिटर 10 रुपये - किमान 5630सह प्रत्येक चौरस मिटरला 13 रुपये 
औद्योगिक पट्यातील भुखंडाचा निवासी किंवा व्यावसायिक वापर - किमान 4500 सह प्रती चौरस मिटर 10 रुपये -किमान 6530 सह 13 रुपये प्रती चौरस मिटर 
सुती गिरण्याच्या भुखंडावरील विकासासाठी - किमान 9750 सह प्रती चौरस मिटरसाठी 23 रुपये - किमान 12 हजार 190 सह प्रती चौरस मिटर 29 रुपये 
शौक्षणिक वैद्यकिय सुविधांकरीत आरक्षीत असलेल्या भुखंडाच्या विकासासाठी - किमान 3000 सह प्रती 10 चौरस मिटरसाठी 18 रुपये -किमान 3750 सह प्रती 10 चौरस मिटरसाठी 23 रुपये 
झोपडपट्टी पुनर्वसन विकास हक्क प्रमाणपत्र - किमान 4500 सह टीडीआर क्षेत्राच्या प्रती चौरस मिटरला 18 रुपये - किमान 5630 रुपये सह टीडीआर क्षेत्राच्या प्रती चौरस मिटरला 23 रुपये 
विविध सुविधांकरीत आरक्षीत असलेला भुखंड - 7500 - 9380 
सांस्कृती वारसा समितीकडून परवानगीसाठी - 3000 - 3750 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget