मुंबई हागणदारी मुक्त झाल्याने व-यूसीआयने पालिकेला दिले र-वच्छता प्रमाणपत्र

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – ‘मुंबई हागणदारी मुक्त’ झाल्याने दिल्ली येथील ‘क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया’ने (क्यूसीआय) मुंबई पलिकेला स्वच्छता प्रमाणपत्र दिले आहे. मात्र या प्रमाणपत्राची वैधता सहा महिन्यांसाठीच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेचे ‘ट्विटर’ वरुन अभिनंदन केले आहे.

मात्र प्रमाणपत्राची वैधता सहा महिन्यांसाठीच
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – ‘मुंबई हागणदारी मुक्त’ झाल्याने दिल्ली येथील ‘क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया’ने (क्यूसीआय) मुंबई पलिकेला स्वच्छता प्रमाणपत्र दिले आहे. मात्र या प्रमाणपत्राची वैधता सहा महिन्यांसाठीच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेचे ‘ट्विटर’ वरुन अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व परिमंडळांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, घनकचरा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हागणदारी होणाऱ्या विभागाच्या ५०० मीटर परिसरात स्वच्छतागृह असावे, असे स्वच्छतागृह आहे हे तेथील रहिवाशांना माहित असण्यासाठी प्रचार करणे, तरीही उघड्यावर जात असतील तर दंडात्मक कारवाई करणे, अशा ‘हागणदारी मुक्ति’साठी केंद्र शासनाचे तीन निकष होते. या सर्व अटींची पालिका पूर्तता करते, असा दावा पालिकेकडून करण्यात आला.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget