पालिका सभांतील निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करा

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेत होणाऱ्या सभांमधून घेण्यात आलेले निर्णय पालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावेत आणि या निर्णयावर नागरिकांकडून सूचना तसेच हरकती मागविण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने ही मागणी केल्याचे सपाने म्हटले आहे.

पालिकेच्या निवडणुकीदरम्यान पारदर्शकतेबाबत भाजपने शिवसेनेने गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे पालिका महासभा, विशेष आणि वैधानिक समित्यांच्या सभेची कार्यक्रम पत्रिका, त्यावर घेण्यात आलेले निर्णय पालिकेच्या संकेतस्थळावर नियमित प्रदर्शित करण्यात यावेत. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयावर नागरिकांच्या सूचना आणि आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलबध करून द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. स्थायी समितीत घेण्यात येणाऱ्या निर्णयावर जास्त प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात येत असल्याने स्थायी समितीत घेतलेल्या निर्णयापासून ही सुविधा सर्वप्रथम सुरु करावी. नंतर इतर समित्यांनीही ही सुविधाही यथावकाश सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget