मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या डिसेंबरपासून

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्प लवकरच राबवला जाणार आहे. कोस्टल बांधण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून कोस्टल रोडसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे येत्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी केलेल्या सादरीकरणावेळी दिली.

  1. मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या डिसेंबरपासून
  2. एक लाख लोकांना रोजगार मिळणार

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्प लवकरच राबवला जाणार आहे. कोस्टल बांधण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून कोस्टल रोडसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे येत्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी केलेल्या सादरीकरणावेळी दिली.

मुंबई पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा कोस्टल रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी स्थायी समितीत कोस्टल रोडबाबत सादरीकरण कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी केले. यावेळी किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण ३५.६ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे माचीवाल यांनी सांगितले.
कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल, तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के अर्थात ३५० टन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होईल, असे माचीवाल यांनी स्पष्ट केले. या मार्गावर सागरी भिंतींची उभारणी केली जाईल. त्यामुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल, असे त्यांनी सांगितले. सागरी मार्गाचे काम झाल्यावर सुमारे १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला आहे

कोस्टल रोडचा मार्ग 
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क बोगदे
अमरसन उद्यान जोडरस्ता
हाजीअली जोडरस्ता
वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (दक्षिण वरळी)
वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (वरळी)
कार्टर रोड जोडरस्ता
रितूंभरा महाविद्यालय जोडरस्ता
मढ बेट जोडरस्ता
ओशिवरा जोडरस्ता
मालाड जोडरस्ता
कांदिवली जोडरस्ता 




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget