पालिकेच्या जलवाहिनीवर वसलेल्या झोपड्या हटविण्यास पालिकेला अपयश

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – गेल्या अनेक वर्षापासून पालिकेच्या जलवाहिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यात मुंबई पालिकेला अपयश आले आहे त्यामुळे आता नुकतीच बांद्रा पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील दोन लहान मुलांचा जलवाहिनी दुर्घटनेत जीव गमवावा लागला आहे. मात्र वैतरणा जलाशयाची जलवाहिनी जुनी असल्यामुळे फुटल्याचे आणि झोपड्या बेकायदा आहेत, असे कारण देत पालिका या दुर्घटनेची जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याचे समजते

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – गेल्या अनेक वर्षापासून पालिकेच्या जलवाहिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यात मुंबई पालिकेला अपयश आले आहे त्यामुळे आता नुकतीच बांद्रा पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील दोन लहान मुलांचा जलवाहिनी दुर्घटनेत जीव गमवावा लागला आहे. मात्र वैतरणा जलाशयाची जलवाहिनी जुनी असल्यामुळे फुटल्याचे आणि झोपड्या बेकायदा आहेत, असे कारण देत पालिका या दुर्घटनेची जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याचे समजते
बांद्रा पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये जलवाहिनी फुटली होती या दुघॅटनत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे या विभागात सुमारे ४०० झोपड्या असून, त्यापैकी १०० झोपड्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे स्थानिक रहिवासांचा संसार ‘पाण्यात’ गेला आहे. मात्र सर्वाधिक फटका २० झोपड्यांना बसला आहे. त्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.
वांद्रे टर्मिनलजवळ इंदिरा नगर असून,शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता वैतरणा जलाशयाकडून देणारी ७२ इंच व्यासाची पाईपलाईन फुटून पाण्याच्या जोरदार प्रवाहात ८ महिन्यांचा विघ्नेश आणि त्याची ९ वर्षांची बहिण प्रियांका डोईफोडे यांचा जीव गेला.या झोपड्या सुमारे ९० वर्षांपूर्वीच्या तानसा जलवाहिनीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील जलवाहिन्यांवर बांधण्यात आलेल्या झोपड्या हटवाव्या लागणार आहेत. या झोपड्या येत्या आॅक्टोबरपर्यंत हटवणे बंधनकारक असल्यामुळे पात्र आणि अपात्र झोपड्यांचे सर्वेक्षण सध्या सुरु असून, इंदिरानगर ही त्यापैकी एक आहे. मात्र ती अनधिकृतपणे वसली असल्याने नुकसान भरपाई देता येणार नाही. येथील जलवाहिनीवर बांधलेल्या पात्र झोपड्यांचे पुर्नवसन येत्या आॅक्टोबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे समजते येईल इंदिरानगर येथील जलवाहिनीला खेटून असलेल्या बेकायदा झोपड्यांना पालिकेकडून २०१५ मध्ये नोटीसा दिल्या होत्या पाईपलाईनच्या दोन्ही बाजूस दहा मीटरपर्यंत असलेल्या झोपड्या हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यावर कारवाई केली तरी पुन्हा झोपड्या बांधल्या जातात, असा पालिकेचा अनुभव आहे येथील अपात्र झोपड्यांवर पालिकेने कारवाई केलेली नाही. परंतु आता दुर्घटना घडल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत झोपड्या हटवण्याचे आश्वासन पालिका देत आहे तसेच शहर विभागात काही ठिकाणी पाईपलाईनवर झडपा बसवण्याचे काम सुरू आहे असून यासाठी २४ तास पाणीपुरवठाही बंद केला होता यामुळे शहर विभागातील जलवाहिन्यांमध्ये पाणी न येण्यासाठी या वाहिनीतील पाणी अडवले गेले आणि पाण्याच्या दाबामुळे ही पाईपलाईन फुटली असण्याची शक्यता पालिकेच्या जल विभागातून सांगण्यात येत आहे ही जलवाहिनी फु टल्यामुळे अंदाजे चार ते पाच लाख लिटर पाणी वाहून गेले असण्याची शक्यता आहे. ही जलवाहिनी फुटल्यानंतर तेथे पाण्याचे उंच कारंजे उच्च दाबाने उसळत होते. ते पाणी झोेपड्यांमध्ये प्रचंड दाबाने घुसले होते.

डोईफोडे यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख दया - विरोधी पक्षनेते रवी राजा
विघ्नेशच्या कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत पालिकेने करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. या विभागात ज्या रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचा आपत्कालिन विभागाकडून सर्वे करुन त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची कारवाई त्वरित करावी असेही रवी राजा यांनी सांगितलेLabels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget