अंधेरी विभागात सहाय्यक आयुक्तांची धडक कारवाई पालिकेचे ४५ भूखंड मोकळे

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – अंधेरी पूर्व के पूर्व चे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी गेल्या वर्षभरात या परिसरातील अनधिकृत बांधकामांद्वारे पालिकेचे भूखंड झोपडीदादांकडून लाटण्याचा प्रयत्न विफल केल्यामुळे व सदर भूखंड पालिकेकडे पुन्हा जमा केल्याने , या मध्ये हितसंबंध असल्यामुळे जाणीवपूर्वक जैन यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे समजते .

  1. अंधेरी विभागात सहाय्यक आयुक्तांची धडक कारवाई 
  2. पालिकेचे ४५ भूखंड मोकळे 

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – अंधेरी पूर्व के पूर्व चे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी गेल्या वर्षभरात या परिसरातील अनधिकृत बांधकामांद्वारे पालिकेचे भूखंड झोपडीदादांकडून लाटण्याचा प्रयत्न विफल केल्यामुळे व सदर भूखंड पालिकेकडे पुन्हा जमा केल्याने , या मध्ये हितसंबंध असल्यामुळे जाणीवपूर्वक जैन यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे समजते .
के पूर्व परिसरातील पालिकेच्या मालकीच्या सुमारे २५ भूखंडावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या . त्या बेकायदशीर झोपझ्ड्यांद्वारे सदर भूखंड गिळंकृत करण्याचा डाव भूखंडमाफियांचा , होता अनेक भागात अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणाची कामे अडकून पडली होती . त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना रहिवाशांना करावा लागत होता . या सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात जैन यांनी धडक मोहीम धडक कारवाई सुरु करून के पूर्व विभागात पालिकेचे सुमारे ४५ भूखंड मोकळे केले . या कारवाईमुळे पालिकेची सुमारे १५ एकर जागा मुक्त झाली त्याची किंमत सुमारे ७०० कोटी एवढी आहे . यातील काही भूखंडावरती उद्याने तसेच रस्तारुंदीकरांची कामे होत असल्याने जनतेला त्याचा फायदा होणार आहे . त्याचप्रमाणे अंधेरी कुर्ला रोडवरील सिंधिया वाडी , निकोलस कंपाउंड , मरोळ तानसा पाइप लाईन येथील शेकडो झोपड्यांवरील तोडक कारवाई करून जागा मोकळ्या केल्या , पालिकेच्या या कारवाईचा फायदा , एम आय डी सी , सीपझ , विमानतळ , तसेच महाकाली गुंफा परिसरातील लोकांना याचा विशेष फायदा झाला .
दरम्यान सहाय्य्क आयुक्त जैन यांच्या या कारवाईमुळे विभागातील अनेक नगरसेवक दुखावले गेल्यामुळे त्यांनी जैन यांच्या विरोधात आघाडी उघडत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे .Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget