बेस्ट चा शिवाजी नगर आगाराचा भूखंड भाड्याने बेस्ट ला मिळणार चार कोटी

बेस्ट चा शिवाजी नगर आगाराचा भूखंड भाड्याने बेस्ट ला मिळणार चार कोटी मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेकडून घाटकोपर - चेंबूर लिंक रोडपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला कास्टिंग गार्डसाठी बेस्ट च्या शिवाजी नगर बस आगाराची जागा भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव आज गुरुवारी बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला . भा ज प सदस्य सुनील गणाचार्य यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतरच प्रस्ताव मंजूर करण्याची भूमिका मांडली , मात्र प्रस्ताव मंजूर करून त्यानंतर सोमवारचा पाहणी दौरा आयोजित करण्याचे निश्चित करीत बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घेतला या प्रस्तावाला विरोध करताना सुनील गणाचार्य यांनी अशाप्रकारे जागा भाड्याने देण्यापूर्वी या ठिकाणी पाहणी दौरा करण्याची मागणी केली , यावर रवी राजा यांनी सदर जागा हि पालिकेच्या कामासाठी दिली जात असून ती केवळ ३० महिन्यांच्या कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट केले . सदर जागा मोकळी असून या जागेचा बस आगारासाठी कोणताही वापर होत नसून सदर जागा भाड्याने दिल्यास चार कोटी २१ लाख रुपये भाडे मिळणार आहे . त्यामुळे जर आर्थिक मदत होत असेल आणि यातून कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने सदर प्रस्ताव मंजूर करून नंतर पाहणी करावी ,अशी सूचना केली , तर अनिल पाटणकर यांनी बेस्ट चे हित पाहता असे प्रस्ताव स्वीकारले पाहिजेत असे सांगितले . दरम्यान बेस्ट चे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सदर जागा हि विशिष्ठ कालावधीसाठी भाड्याने देण्यात येत असून प्रति चौ मी ४० रुपये दराने भाड्याने मागितली होती , परंतु भाड्याचे दर १३९ रुपये प्रति चौरस मीटरने करून हि जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला , या दरवाढीसाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त वेळ लागला असण्याचा खुलासा हि त्यांनी केला .

  • बेस्ट चा शिवाजी नगर आगाराचा भूखंड भाड्याने 
  • बेस्ट ला मिळणार चार कोटी 
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेकडून घाटकोपर - चेंबूर लिंक रोडपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला कास्टिंग गार्डसाठी बेस्ट च्या शिवाजी नगर बस आगाराची जागा भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव आज गुरुवारी बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला . भा ज प सदस्य सुनील गणाचार्य यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतरच प्रस्ताव मंजूर करण्याची भूमिका मांडली , मात्र प्रस्ताव मंजूर करून त्यानंतर सोमवारचा पाहणी दौरा आयोजित करण्याचे निश्चित करीत बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घेतला
या प्रस्तावाला विरोध करताना सुनील गणाचार्य यांनी अशाप्रकारे जागा भाड्याने देण्यापूर्वी या ठिकाणी पाहणी दौरा करण्याची मागणी केली , यावर रवी राजा यांनी सदर जागा हि पालिकेच्या कामासाठी दिली जात असून ती केवळ ३० महिन्यांच्या कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट केले . सदर जागा मोकळी असून या जागेचा बस आगारासाठी कोणताही वापर होत नसून सदर जागा भाड्याने दिल्यास चार कोटी २१ लाख रुपये भाडे मिळणार आहे . त्यामुळे जर आर्थिक मदत होत असेल आणि यातून कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने सदर प्रस्ताव मंजूर करून नंतर पाहणी करावी ,अशी सूचना केली , तर अनिल पाटणकर यांनी बेस्ट चे हित पाहता असे प्रस्ताव स्वीकारले पाहिजेत असे सांगितले .
दरम्यान बेस्ट चे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सदर जागा हि विशिष्ठ कालावधीसाठी भाड्याने देण्यात येत असून प्रति चौ मी ४० रुपये दराने भाड्याने मागितली होती , परंतु भाड्याचे दर १३९ रुपये प्रति चौरस मीटरने करून हि जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला , या दरवाढीसाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त वेळ लागला असण्याचा खुलासा हि त्यांनी केला .Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget