मुंबईकरांनीही मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे - आदित्य ठाकरे

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील ज्या विभागात गरजेपेक्षा कमी शौचालये आहेत त्या ठिकाणी नवीन शौचालये बांधण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये सर्व सुविधांनी समृद्ध अशी शौचालये नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सुरुवात झाली आहे परंतु महापालिका अजून बांधकाम करणार आहे. परंतु मुंबईकरांनीदेखील आपले हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले

शौचालयाचा उदघाटन सोहळा संपन्न

पालिकेच्या वतीने दादर एसटी स्टँडच्या परिसरात सर्व सुविधायुक्त असे सुलभ शौचालय संकुल बांधण्यात आले आहे. यामध्ये वातानुकूल यंत्रणा, सोलर पॅनल, सॅनिटरी पॅडस् डिस्पेंसिंग मशीन आदी सुविधा उपलब्ध आहेत. अश शौचालयाचे उदघाटन शनिवारी रोजी ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. एच.डी.एफ.सी आणि मुंबई पालिकेच्या वतीने आधुनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात जे वचन दिले होते ते पाळले आहे. महिलांसाठी या शौचालयात सॅनिटरी पॅडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका जिथे जिथे शौचालयांची दुरवस्था आहे तिथे त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या शौचालयात महिलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे सांगून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले मुंबईकर जोपर्यंत साथ देणार नाहीत तोपर्यंत मुंबई स्वच्छ होणार नाही. मुंबई ‘हागणदारीमुक्त’ होणार नाही. त्यासाठी मुंबईकरांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget