आरोग्य विभागात बनावट कागदपत्राव्दारे कंत्राट, पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात थ्री डोम ऑपरेशन लाईट खरेदीसाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण समोर आले आहे याचे पडसाद आज बुधवारी पालिका र-थायी समितीत चांगलेच गाजले प्रशासनाला धारेवर धरले भाजपचा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून पालिकेने याची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी लावून धरली याबाबतची संपूर्ण माहिती येत्या बैठकीत पालिकेने सादर करावी असे निर्देश र-थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले. मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका आरोग्य सेवा पुरवत आहे दरवर्षी आरोग्यावर कोटयावधी रुपये खर्च करित आहे मात्र पालिकेच्या रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदीसाठी आवश्यक असलेले उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र (सीई) सादर करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने भलताच तांत्रिक अहवाल सादर केला. यात बनावट कागदपत्रे सादर करून हे कंत्राट सहजरित्या मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट कागदपत्रे सादर करूनही याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला आहे, त्यामुळे असे कंत्राट कोणत्या अधिका-यांनी दिले, शिवाय बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवणा-या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्य़ाव्दारे मागणी केली. या मुद्द्याला नगरसेवकांनी पाठींबा देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यापूर्वीही आरोग्य विभागात बनावट कागदपत्रे देऊन कंत्राटे मिळवली गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांना मान्यता देऊन कंत्राटे कशी दिली जातात, असा सवाल विचारत प्रशासनाला धारेवर धरले दरम्यान या कंत्राटदाराने सीई प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे निविदेमधील अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. मात्र तरीही संबंधित कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. बनावट कागदपत्रे सादर करून आरोग्य विभागात देण्यात येणारी कंत्राटाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

पालिका रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभागात आवश्यक असणाऱ्या दिव्यांची खरेदी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभाग, आरोग्य खाते आणि केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून केली जाते. तिन्ही विभाग रुग्णालयांच्या गरजेनुसार या दिव्यांची (थ्री डोम ऑपरेशन लाईट) खरेदी करीत असतात. काही महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून ३० ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदी करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. दिव्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे ‘सीई’ (सर्टिफिकेट युरोप-उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे बंधन निविदेमध्ये घालण्यात आले होते. रुग्णालयाला लागणारी उत्पादने प्रमाणित केल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून सीई प्रमाणपत्र दिले जाते.निविदा प्रक्रियेअंती पालिकेने एका कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले. परंतु या कंत्राटदाराने सीई प्रमाणपत्राऐवजी ‘एसझेडयू टेस्ट’ या युरोपियन यंत्रणेने दिलेला ‘तांत्रिक कागदपत्रांचा आढावा अहवाल’ (टेक्निकल डॉक्युमेन्टेशन रिव्ह्य़ू रिपोर्ट) पालिकेला सादर केला. या अहवालाच्या आधारे पालिका अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय घेतला.

सीआयडी चौकशी करा
आरोग्य विभागात कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली जातात. ज्या कंत्राटदाराने अशा प्रकारे कंत्राट मिळवले त्याच्यावर एफआयआर दाखल करून सीआयडी चौकशी करावी अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget