भायखळा येथील राणीबागसह पेंग्विन दर्शन शुल्कवाढीचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर

  1. भायखळा येथील राणीबागसह पेंग्विन दर्शन शुल्कवाढीचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर
  2. पालिकेतील पहारेक-यांचा पहारा मात्र यावेळी निष्फळ
  3. भाजपच्या विरोधानंतरही, शुल्कवाढ मंजूर करण्यास शिवसेनेला यश
  4. 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी
  5. मुंबईकरांच्या खिश्याला कात्री

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सर्वात जुने आणि जगप्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या भायखळा येथील विरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन पाहणे व मॉर्निंग वॉकसाठीच्या शुल्कवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी पालिका सभागृहात विरोधीपक्षाच्या विरोधाला न जुमानता शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यास सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच यश आले शुल्कवाढीला आतापर्यंत छाती ठोक विरोध करणा-या भाजपचा पहारा मात्र यावेळी निष्फळ ठरला त्यामुळे शुल्कवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले येत्या 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना पेंग्विन दर्शन आता चांगलेच महाग होणार आहे. मुंबईकरांच्या खिश्याला आता चांगलीच कात्री लागणार आहे

भायखळा येथील राणीबाग व पेंग्निन पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांच्या प्रवेश शुल्क वाढी बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलाच विषय गाजत होता मात्र आता याला कायमचा विराम मिळाला आहे या शुल्कवाढीला भाजपने तीव्र विरोध केला होता. बाजार व उद्यान समितीमध्ये या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. त्यानंतर स्थायी समितीत या प्रस्तावावर विरोधकांना चर्चा करू न देता शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर शिवसेना -भाजपमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाला सोबत घेऊन भाजप हा प्रस्ताव रोखणार असेच चित्र होते. गुरुवारी हा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर त्यावर भाजप, विरोधकांना बोलू न देता मंजूर केला. मात्र भाजपकडून प्रखरपणे विरोध केल्याचे दिसले नाही. त्यामुळे शुल्कवाढ होऊ नये यासाठी विरोध करणा-या भाजपचा पहारा निष्फळ ठरल्याची चर्चा पालिकेत होती.
मागील महिन्य़ांत झालेल्या स्थायी समितीत प्रवेश शुल्कात फारसा बदल न करता जैसे थे ठेवत मंजुरी मिळवण्यास शिवसेनेला यश आले. राणीबागेतील चार व्यक्तीच्या कुटुंबासाठीचे 100 रुपये शुल्कवाढ कायम ठेवण्यात आले असून कुटुंबासोबत येणा-या पाचव्या व्यक्तीस किंवा सिंगल व्यक्तीला मात्र 100 रुपयांवरून 50 रुपये व 12 वर्षाच्या आतील मुलास 25 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. शिवाय मॉर्निंग वॉक साठी 150 रुपयाची शुल्कवाढ कायम ठेवण्यात आली आहे. स्थायी समितीत जोरदार विरोध करीत भाजप व सपाने सभात्याग केला होता. गुरुवारी सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर भाजपचा या विरोधात आक्रमक दिसला नाही राणीच्या बागेतील पेंग्विन दालनाचे महिन्याला वीज बील दहा लाख रुपयाहून अधिक येत असून त्याच्या देखभालीसाठीही लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा करत प्रशासनाने राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरुन 100 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीत मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीतही मंजूर करण्यास शिवसेनेला यश आले होते. येथे मंजूर झाला असला तरी सभागृहात रोखू अशी कडक भूमिका घेतलेल्या भाजपला मात्र आज गुरुवारी अपय़श आले

शुल्कवाढ अशी असणार
- राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : 50 रुपये
- तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
- सिंगल व्यक्तीसाठी तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी 50 रुपये
शालेय विद्यार्थ्यांसाठी -
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.

-- सकाळी सहा ते आठपर्यंत मॉर्निंगवॉकसाठी : मासिक १५0 रुपये.
संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी -
१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget