मुंबईत विविध आजारांचा थैमान पालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत पावसाळा सुरू झाला असून या मुंबापुरीत विविध आजार प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पालिकेच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण कमी असले तरी खाजगी रुग्णालयातील रुग्णाची संख्या पाहिल्यास हि संख्या दिडपटीने वाढलेली आहे या आजारांचे प्रमाण वाढत असताना पालिकेच्या रुग्णालयात जीवरक्षक औषधांचा तुटवडा आहे यामुळे अतिदक्षता व आयसीयू मधील रुग्णांचे हाल प्रचंड होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.

मुंबईत विविध आजारांचा थैमान
पालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत पावसाळा सुरू झाला असून या मुंबापुरीत विविध आजार प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पालिकेच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण कमी असले तरी खाजगी रुग्णालयातील रुग्णाची संख्या पाहिल्यास हि संख्या दिडपटीने वाढलेली आहे या आजारांचे प्रमाण वाढत असताना पालिकेच्या रुग्णालयात जीवरक्षक औषधांचा तुटवडा आहे यामुळे अतिदक्षता व आयसीयू मधील रुग्णांचे हाल प्रचंड होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या मुंबापुरीतील जनतेला मुंबई पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे मात्र देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेत राजकीय पक्षांद्वारे मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे या राजकारणाला सामान्य मुंबईकर नागरिकांना रस नसून त्यांना कचरा, पाणी, आरोग्य त्यांना सुविधा हव्या आहेत.या सुविधा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी वाघ यांच्या नेत्रुत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी मुंबई पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, पालिकेतील गटनेत्या राखी जाधव आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या. या भेटी नंतर वाघ पत्रकारांशी बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या मुंबईत गेल्या अनेक महिन्यांपासून विविध साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे असे असताना पालिका रुग्णालयात जीवरक्षक औषधे नाहित पालिका काय करते असा प्रश्न विचारून पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये योग्य औषधसाठा उपलब्ध नसून लोकांचा पालिकेच्या हॉस्पिटलवरून भरोसा उठलाय पालिकेकडे जे प्रसुतीग्रुह उपलब्ध आहे तेथे गावगुंडांनी हैदोस घालताय. अशामध्ये महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे, अनेक ठिकाणी रात्री पाणी पुरवठा होत आहे यामुळे नोकरदार महिलांना रात्रीचे जागून पाणी भरावे लागत असल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वाघ म्हणाल्या. १ सप्टेंबर पासून सोसायटी मध्ये कचरा वर्गीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी लागणारी जागा अनेक ठिकाणी नाही, असा कचरा वर्गीकरण करणे हि पालिकेची जबाबदारी असल्याची आठवण आयुक्तांना करून देण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget