पालिकेच्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दया शिवसेनेची मागणी

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर पासून सुरु होणार आहे.या कोस्टल रोडचे काम सुरु होण्या आधीच या सागरी रस्त्याला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सोमवारी प्रस्ताव येणार

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर पासून सुरु होणार आहे.या कोस्टल रोडचे काम सुरु होण्या आधीच या सागरी रस्त्याला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.
मुंबईतील कोस्टल रोड बांधण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले होते. पालिकेत सत्ता आल्यानंतर कोस्टल रोडला लवकरात लवकर कशी सुरुवात होईल यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नात होते. याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव आल्यावर सादरीकरणाची मागणी करण्यात आली होती. या सादरीकरणा दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरु होणार असल्याचे कळताच शिवसेनेने या कोस्टल रोडला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कीर्तिकर यांच्या मागणीनुसार यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार येत्या सोमवारी, 10 जुलै रोजी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत या बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget