पालिकेच्या आता बंद पडलेल्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या ३५ मराठी शाळा बंद पडल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या दर्जेदार शिक्षक आणि शिक्षण असलेल्या शाळा सुरु करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणाला सोमवारी पालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांना दिली. पालिकेच्या शाळांचा घसरलेला शैक्षणिक दर्जा, निकालाची घसरती टक्केवारी, पाल्याला इंग्रजी माध्यमात शिकवण्याचे पालकांचे फॅड आणि विद्यार्थ्यांची गळती हे लक्षात घेता पालिकेच्या ३५ मराठी शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यम सुरू होणार आहेत

खाजगी संस्थांना ५ वर्षे शाळा देणार

या इंग्रजी शाळांसाठी पालिका सर्वप्रकारची व्यवस्था करणार आहे, या शाळा सुरु करणा-या संस्थेला पाच वर्षांचा अनुभव हवा, पालिकेची शाळा खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, असे महापौैरांनी सांगितले.
मात्र या धोरणाला मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते दिलिप लांडे यांनी या धोरणाला आणि निर्णयाला विरोध केला आहे. मराठी शाळा बंद पाडण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण चुकीचे आहे. ज्या इंग्रजी शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे, त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा महापालिका का सुरु करत नाही, असा सवाल लांडे यांनी केला. मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांचा दर्जा वाढण्यासाठी प्रशासन का प्रयत्न करत नाही, मराठी शाळा चांगल्या पद्धतीने सुरु राहण्यासाठी व त्या बंद पडू नयेत यासाठी प्रशासन का प्रयत्नशील नाही, असेही ते म्हणाले.
पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही लांडे यांच्यात सूर मिसळून पालिकेचा शैक्षणिक दर्जा आणि शिक्षक हे योग्य नसल्यामुळे पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती होत आहे व एकापाठोपाठ मराठी शाळा बंद पडत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील गरिबांनाही आपल्या पाल्याने इंग्रजीत शिक्षण घ्यावे असे वाटते. पण पालिकेच्या शाळांमध्ये नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीचे वर्ग नाहीत तसेच १० वीपर्यंतची इंग्रजी शाळा नाही. यामुळेच तसे न झाल्याने पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची गळती होते व शाळा बंद पडतात, असे राजा म्हणाले.Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget