बेस्ट कामगारांना आता लवकरच विमा योजना लागू होणार

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –बेस्ट कामगारांना कर्मचारी विमा योजना लागू करण्याचा निर्णय आज बेस्ट समितीच्या बैठकीत झाला. आर्थिक संकटात असल्याने ही योजना गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती. सर्वपक्षीय सदस्यांनी या योजनेला मंजुरी दिली. सुमारे सहा लाखांपर्यंतचा मोबदला या योजनेच्या माध्यमातून मिळेल, अशी माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. 1 ऑगस्ट 1976 पासून कर्मचारी ठेव निगडित विमा योजना (ईडीएलआय) अंमलात आली. त्यानंतर 1979 पासून भारतीय आयुर्विमा मंडळाची गटविकास योजना स्वीकारली. या योजनेची अंमलबजावणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या मान्यतेने करण्यात आली. त्यामुळे बेस्ट उपक्रमात कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेऐवजी गटविमा योजना अंमलात आली. यानुसार मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना निधीमधून विम्याची रक्कम दिली जाईल. या योजनेच्या निधीची गुंतवणूक वेळोवेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीहविभागाकडून करण्यात येईल.

  • बेस्ट कामगारांना आता लवकरच विमा योजना लागू होणार
  • बेस्ट समितीची मंजुरी

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget