एम पूर्व' विभागात २१ अनधिकृत झोपड्या निष्कासित

चक्की नाल्याच्या भोवताली झाले होते अतिक्रमण
कारवाईमुळे चक्कीनाल्याच्या रूंदीकरणाने होणार पाण्याचा प्रभावी निचरा
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या 'एम पूर्व' विभागातील प्रभाग क्रमांक १३९ मधील बुद्धनगर येथील चक्कीनाल्याच्या दोन्ही बाजूस झोपडीधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे सदर नाल्याच्या रूंदीकरणाचे काम ब-याच कालावधीपासून रखडले होते. या अतिक्रमणांमुळे येथे पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यास मोठ्या प्रमाणावर अडसर येत होता. या कारवाईमुळे चक्कीनाल्याचे रूंदीकरण आता करता येणार असल्याने या भागातील सखल ठिकाणी जमा होणा-या पाण्याचा प्रभावीपणे निचरा होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एम / पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.

पालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार एम पूर्व विभागाद्वारे गेले तीन दिवस करण्यात आलेल्या या धडक कारवाईमध्ये २१ झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत पालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंता, २ कनिष्ठ अभियंता, ४३ कामगार – कर्मचारी सहभागी झाले होते. देवनार पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली. त्याचबरोबर १ जेसीबी, डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री या कारवाई दरम्यान वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget