जंव-शनवरील अपघात टाळण्यासाठी आता जंव-शनचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत लोकांची संख्या वाढत आहे तशी वाहनांची संख्या वाढत आहे या मुंबईतील ‘जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोकांचा बळी जात आहे हे अपघात आता टाळण्यासाठी ‘जंक्शन्स’चा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.त्याची सुरुवात आता वांद्रे आणि मालाड येथे प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे लवकरच सीएसटी, चर्चगेटसह ४० ठिकाणी चौकांमध्ये बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पालिकेचे रस्ते आणि वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबापुरीचे नाव संपूर्ण जगात आहे त्यामुळे या मुंबापुरीकडे सर्वाचे लक्ष असते 24 तास गजबजलेल्या मुंबईत वाहणाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या मुंबापुरीत जंक्शन तयार करण्यात आले आहेत या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अपघात अधिक होत आहेत हे अपघात टाळण्यासाठी जंक्शनचा चेहरामोहरा आता बदल करण्यात येणार आहे पहिले आता वांद्रे टर्नर रोड येथील हा प्रयोग यशस्वी केल्यानंतर येत्या आॅक्टोबरपासून मुंबईत सीएसटी, चर्चगेट व अन्य ४० ठिकाणी या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आधीच्या दोन प्रयोगांसंबंधी आलेल्या सूचना, शिफारशी,अनुभव यांचा अभ्यास करुन त्याआधारे नव्या ‘जंक्शन्स’मध्ये योग्य ते बदल करण्यात येणार आहेत असेही दराडे यांनी सांगितले नव्या ठिकाणांची नावे पालिकेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित विशेषत: पादचा-यांना प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ने (बीआयजीआरएस) ‘नॅक्टो-जीडीसीआय आणि ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट’(डब्ल्यूआरआय) या संस्थांच्या व मुंबई पालिका तसेच मुंबई वाहतूक पोलिस यांच्या मदतीने मालाड येथील मिठ चौकी आणि वांद्रे येथील ‘एचपी जंक्शन’चे पुनर्आरेखन केले आहे. मुंबईतील पादचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मोेठे आव्हानात्मक काम असल्याने गेल्या आठवड्यात ‘बीआयजीआरएस’ व अन्य संलग्न संस्थांनी मालाड येथील मिठ चौकी जंक्शनची चाचणी घेतली आणि या प्रयोगासाठी ही सर्वोत्कृष्ट ‘साईट’ असल्याचा अभिप्राय दिला. या ठिकाणी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मुत्यूंचे व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी सुमारे १६५० चौरस मीटर जागा मिळवण्यात आली. या जागेचा कमी वापर होत असल्यामुळे त्याचा वापर पादचा-यांच्या सुरक्षित प्रवासासाठी करण्यात आला, असे ‘नॅक्टो’च्या संचालिका स्काई डंकन यांनी सांगितले. दराडे यांच्यासह पालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रर-ते अपघातात 562 जणांचा मृत्यू

मुंबईतील रस्ते अपघातांत २०१६ मध्ये तब्बल ५६२ जणांचा बळी गेला. ज्यामध्ये ५० टक्क्याहून अधिक पादचारी होते. विशेष म्हणजे, अपघात होण्याचे सर्वाधिक प्रमाण चौकांवर (जंक्शन्स) होते. ही गंभीर बाब आहे. ‘जंक्शन’वर पादचा-यांचे अपघात टाळण्यासाठी चौकांचे योग्य रितीने आरेखन (डिझाईन) केल्यास वाहतूक कोंडी कमी होते शिवाय पादचा-यांना रस्ता सहज ओलांडतात येतात

जंक्शनचे अभ्यास पूर्ण डिझाईन

मुंबईत वेगाने येणा-या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यांचे ‘कॉर्नर’ कमी करुन गल्ल्या अरुंद करण्यात आले आहेत केल्या. वाहनांचा वेग कमी झाला. त्याचवेळी रस्त्यांच्या लगतचे पदपथ अंदाजे २७ टक्क्यांनी रुंद झाले आहेत या बदलांमुळे रस्ता अधिक रुंद झाला आणि रस्ते सहज ओलांडणे शक्य झाले.या ‘जंक्शन्स’चे अभ्यासपूर्ण डिझाईन केल्यास वाहतूक कोंडी कमी होवून अपघाताचे प्रमाण तर घटतेच शिवाय पादचा-यांना रस्ते ओलांडणेही सहज शक्य होते. बीआयजीआरएस यांनी मुंबई पालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मालाड येथील मिठचौकी आणि बांद्रा येथील एचपी जंक्शनचे अभ्यासपूर्ण ‘डिझाईन’ करून त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर सुरु केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे यामुळे पादचा-यांनाही चालण्यासाठी २७ टक्के अधिक जागा मिळाली, असा दावा करण्यात आला आहे त

कायमस्‍वरूपी बदल घडवणार

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट’ने मुंबई पालिका आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्यासोबत मुंबईत मोठ्या प्रमाणात धोके असलेल्या चौैकांमध्ये सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये सहकार्य करार केला असून वांद्रे येथील एचपी पंप चौकात केलेल्या प्रयोगासाठी बदलाची जबाबदारी ‘बीआयजीआरएस प्रोग्राम’ने घेतली असून, गर्दीच्या वेळी पाच हजारांहून अधिक वाहने आणि तेवढेच पादचारी येथून जात असून, १६ मेपर्यंत हे बदल तसेच ठेवण्यात आले. यानंतर कायमस्वरुपी बदल घडवून या रस्त्यावर दुस-या बाजूचे काम हे पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहे
बीआयजीआरएसचे’ लार्सन
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget