भूखंडाच्या भाडेकराच्या नव्या धोरणाला पालिका सुधार समितीची मंजुरी

या धोरणामुळे पालिकेला मिळणार जास्त महसूल
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत आपल्या मालकीच्या भूखंडांसाठी पालिकेने नवे धोरण बनवले आहे या नव्या धोरणाला सुधार समितीने बुधवारी मंजुरी दिली आहे त्यामुळे आता या नव्या धोरणानुसार मुंबई पालिकेला आता जास्त महसूल मिळणार असून अनेक भूखंडांची मालकीहक्क पालिकेकडे राहणार आहेत. पालिकेच्या नव्या धोरणातून महालक्ष्मी येथील रेसकोर्ससह वेलिंग्टन क्लब सारख्या मोठ्या भूखडांना या नव्या धोरणातून वगळले आहे अश्या मोठ्या भूखंडांसाठी वेगळे धोरण आखले जाणार आहे अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी दिली आहे.

मुंबई शहर सुधार विश्वस्त सन 1933 मध्ये महापालिकेत विलीन झाल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अखत्यारित येत असलेले सर्व भूखंड हे महापालिकेच्या ताब्यात आले. अनुसूचित डब्ल्यू, अनुसूचित व्ही, अनुसूचित एक्स, अनुसूचित वाय, अनुसूचित झेड आणि महापालिका अशाप्रकारे 4 हजार 177 भूखंड हे कायमस्वरुपी, 999 वर्षे ते दहा वर्षे या कालावधीसाठी भाडेकरारावर दिलेले आहेत. यातील 242 भूखंडांचे भाडेकरार संपुष्टात आलेले असून त्यांचे नुतनीकरण झालेले नाही. महापालिकेने 4 हजार 177 भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या नुतनीकरणाबाबत धोरणाचे सुधार समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर या धोरणाला मंजुरी देण्यात आल्याचे बाळा नर यांनी सांगितले.

नव्या धोरणानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ज्या भूखंडांवर २५ टक्क्याहून कमी बांधकाम आहे अश्या व आरजीपीजी भूखंडांचा भाडेकरार वाढवण्यात येणार नाही. यामुळे असे भूखंड पालिकेकडेच राहणार आहेत. भाडेकरारात कोणतेही बदल झाल्यास असे बदल पालिकेच्या निदर्शनास आल्यावर या भूखंडांचे जुने करार रद्द होऊन त्याचे रूपांतर ३० वर्षांसाठी केले जाणार आहे. यामुळे ९९९ वर्षे भाडेतत्त्वावरील 1247 भूखंड व 999 वर्षासाठी भाडेतत्वार असलेले 2148 भूखंडांचे भाडेकरार ३० वर्षाचे होणार असल्याचे बाळा नर यांनी सांगितले.

४१७७ पैकी २४२ भूखंडांचे भाडेकरार आता या नव्या धोरणानुसार केले जाणार आहेत. तसेच अनेक भूखंडांवरील इमारती जीर्ण झाल्या असल्याने त्याची पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. जुन्या धोरणानुसार एका चौरस मीटरला एक रुपया भाडे पालिकेला मिळत होते. आता भाडेकरारात कोणताही बदल झाल्यास महापालिकेला रेडी ऐकणार नुसार एक टक्का भाडे मिळणार आहे. यामुळे पालिकेचा महसूल वाढणार असलत्याचे बाळा नर यांनी सांगितले.
भाडेकरारावरील भूखंड--
कालावधी                         --    एकूण मालमत्ता          ---
कायमस्वरुपी                 ----      1247
999  वर्ष                          ---    2148
120 वर्ष                          --         01
99 वर्ष                           ---       584
25 ते 70 वर्ष                   ---      193
10 वर्ष                           ----       04
........                             -----------------------
  एकूण               -                   4177
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget