मुलूंड क्षेपणभूमी व पूर्व उपनगरातील नालेसफाई कामांची महापौरांनी केली पाहणी


मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुलूंड क्षेपणभूमी व पूर्व उपनगरातील नालेसफाई कामांची मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव व स्‍थायी समिती अध्‍यक्षरमेश कोरगावंकर यांच्‍या समवेत पाहणी करुन आढावा घेतला.

या पाहणी दौऱयाला सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष अनिल कोकीळ, नगरसेवक शेखर वायंगणकर, उप आयुक्‍त (परिमंडळ – ५) भारत मराठे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्‍प) (प्र.) लक्ष्‍मण व्‍हटकर, एम/पूर्व विभागाचे सहाय़क आयुक्‍त श्रीनिवास किलजे, एन विभागाच्‍या सहाय़क आयुक्‍त भाग्‍यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घ.क.व्‍य) सिराज अन्‍सारी तसेच सं‍बधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मूलूंड क्षेपणभूमीची पाहणी केल्‍यानंतर महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी कचऱयापासून विजनिर्मिती तसेच मिथेन गॅस व कचऱयावर प्रक्रिया करणारा काही प्रकल्‍प भविष्‍यात याठिकाणी पालिकेतर्फे राबविण्‍यात येणार आहे का याची माहिती संबंधित अधिकाऱयांकडून जाणून घेतली. 

पर्यावरणदृष्‍टया योग्‍य त्‍या पध्‍दतीने खबरदारी घेण्‍याबाबत त्‍यांनी संबधित अधिकाऱयांना निर्देश दिले. त्‍याचप्रमाणे भविष्‍यकाळात कशा पध्‍दतीने हा प्रकल्‍प हाताळण्‍यात येणार आहे याची सविस्‍तर माहिती सादर करण्‍याची सूचना त्‍यांनी संबधित अधिकाऱयांना केली ‍ त्‍यानंतर महापौर व इतर पदाधिकाऱयांनी मुलूंड (पूर्व) च्‍या बांऊंडी नाला, केसरबाग नाला तसेच नानेपाडा नाल्‍याची पाहणी केली. नाल्‍यामधील तरंगता कचरा वेळोवेळी काढणे तसेच काढण्‍यात आलेला गाळ उचलणे व नाल्‍याकाठचा परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची सूचना केली. त्‍याचप्रमाणे नानेपाडा नाल्‍याचे रेल्‍वे हद्दीतील रुंदीकरणाचे काम ताबडतोब मार्गी लावण्‍याबाबत रेल्‍वेकडे पाठपुरावा करण्‍याची सूचना त्‍यांनी संबधित अधिकाऱयांना केली. त्‍यानंतर महापौरांनी एस विभागातील बॉम्‍बे ऑक्‍सीजन नाला, उषा नगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाल्‍याची पदाधिकाऱयांसमवेत पाहणी केली. त्‍यानंतर एन विभागातील लक्ष्‍मीबाग नाला, सोमैय्या नाला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैदान) ची पाहणी केली. लक्ष्‍मीबाग नाल्‍याकाठी राहणाऱया नागरिकांना पावसाळयात कोणत्‍याही प्रकारे धोका निर्माण होऊ नये तसेच त्‍यांचे या ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी स्‍थलांतर करण्‍याची कार्यवाही ताबडतोब करण्‍याची सूचना त्‍यांनी संबधित अधिकाऱयांना केली. त्‍यानंतर महापौरांनी एम/पूर्व विभागातील मानखुर्द नाला, देवनार नाला आणिक बस डेपोसमोरील माहूल क्रिक नाल्‍याची पाहणी केली. नाल्‍याकाठी राहणाऱया नागरिकांनी नाल्‍यात सरळ कचरा न टाकता कचरा संकलन केंद्रावर कचरा टाकावा याबाबत जनजागृती करावी अशी सूचना त्‍यांनी संबधित अधिकाऱयांना दिली. त्‍यानंतर महापौरांनी पद्मविभुषण वसंतदादा पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला सदिच्‍छा भेट दिली. महापौर व इतर पदाधिकाऱयांचा संस्‍थेच्‍या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget