ओल्‍या कच-यापासून गांडुळ खत निर्मिती प्रकल्‍पाचा प्रारंभ


मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – ‘चकाचक मुंबई, स्‍वच्‍छ भारत प्रबोधन अभियान’ अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर रुग्‍णालय येथे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ओल्‍या कचऱयापासून गांडुळ खत निर्मिती प्रकल्‍पाचा प्रारंभ करण्यात आला.
गांडुळ खत निर्मिती प्रकल्‍प ‘आस्‍था महिला बचत गट’ यांच्‍या माध्‍यमातून सुरु करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पामध्‍ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय यांच्‍या उपहारगृहातून निर्माण होणारा नैसर्गिक ओला कचरा तसेच परिसरातील झाडांचा पाला-पाचोळ्यापासून दररोज सुमारे १५०-२०० किलो ओल्‍या कचऱयापासून गांडुळ खत निर्मिती करण्‍यात येते. प्रमुख समन्‍वय अधिकारी सुभाष दळवी यांनी स्‍वच्‍छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत हा प्रकल्‍प विकसित केला आहे. या प्रकल्पामुळे गांडुळ व खताचे आपोआपच विघटन होते. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी आस्‍था महिला बचत गटाच्‍या अध्‍यक्षा अश्विनी बोरुडे यांच्‍याकडून गांडुळ खत‍ निर्मितीबाबत माहिती जाणून घेतली. पालिकेसाठी हा उपक्रम एक आदर्श उपक्रम म्‍हणून ठरणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. गणेश शिंदे, माजी नगरसेवक राजू पेडणेकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget