पालिकेच्या महत्वाच्या चिटणीसपदी प्रकाश जेकटे यांची नियुक्ती

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या महत्वाच्या पालिका चिटणीस नारायण पठाडे हे बुधवारी सेवा निवृत झाल्याने या रिक्त पदावर उपचिटणीस प्रकाश जेकटे यांची नियुक्ती झाली आहे. तशी बुधवारी नियुक्तीची ऑर्डरही जेकटे य़ांना देण्यात आली असून ते आज गुरुवारी 1 जूनपासून चिटणीस पदाचा पद् भार स्वीकारणार आहेत. दरम्यान, पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर होईपर्यंत ते प्रभारी चिटणीस म्हणून काम पाहणार आहेत.

पठाडे 31 मे रोजी नियमानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी सरचिटणीस विभागातील उपचिटणीस प्रकाश जेकटे व रजनीकांत संख्ये या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र सेवेतील अनुभवा नुसार पदोन्नती देण्याचा पालिका अधिनियम आहे. त्यामुळे संखे यांच्यापेक्षा दीड वर्षांचा जास्त अनुभव असलेल्या जेकटे यांची चिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रकाश जेकटे यांना महापालिका सभेचा, स्थायी समितीचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याच तुलनेत संखेचा अनुभव ही समान आहे. दोन्ही अधिकारी तुल्यबळ असल्याने प्रशासनासमोर पेच होता. मात्र सेवाज्येष्ठता नुसार विचार झाल्याने चिटणीस पदाचे सूत्र जेकटे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर होईपर्यंत जेकटे प्रभारी चिटणीस व त्यानंतर चिटणीस म्हणून त्यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget