मुंबईत खतरनाक र-वाईन प-लूचा शिरकाव


मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण
आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खतरनाक र-वाईन प-लूने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मुंबईत उपचारांसाठी आलेल्या 7 महिन्यांच्या गरोदर मातेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे असून जानेवारी ते आतपर्यंत हा तिसरा मृत्यू तर सुमारे दोन हजार 26 लोकांची र-वाईन प-लूची तपासणी करण्यात आली आहे मुंबईत या आजाराने डोके वर काढल्याने पालिका आरोग्य विभागाचे धाबे चांगलेच दणाणले असून धावपळ सुरू झाली आहे

मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेलाच मुंबई पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरवत असताना त्याचे आरोग्याचीही काळजी घेत असते सन 2015 मध्ये र-वाईन प-लूने मुंबईत थैमान घातले होते त्यावेळी पालिकेची चांगलीच तारांबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा मुंबईत थैमान घालण्यास सुरुवात केली आहे या खतरनाक आजाराने शिरकाव केल्याने पालिकेचे धाबे चांगलेच दणाणले असून मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे यंदा जानेवारी ते आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे दोन हजार 26 लोकांची र-वाईन प-लूची तपासणी करण्यात आली आहे 16 मे रोजी या महिलेचा मृत्यू उपचारा दरम्यान झाल्याचे सांगण्यात येते. अलाबाबादमधून एक महिन्यापूर्वी ही महिला मुंबईत आली होती व भांडूपच्या टिळक - नगर येथे राहत होती. दरम्यान दम्याचा त्रास असलेल्या या महिलेला चार पाच दिवसांपासून ताप, उलट्या कफ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने तिला भांडूपच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिला शिवडीच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले. टॅमीफ्लू सुरू असतानाच तिचे सॅम्पल स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयाला पाठविण्यात आले. ज्या दिवशी रिपोर्ट आला त्याच दिवशी या महिलेचा सकाळी अकरा वाजता मृत्यू झाला. मुंबईत स्वाईन फ्लूने घेतलेला हा तिसरा बळी आहे. महिला राहत असलेल्या परिसरात 11 जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले आहे.राज्यात जानेवारी महिन्यांपासून 210 जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यापैकी 5 रुग्ण राज्याबाहेरुन उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे मृत्यू आहेत. दोन रुग्ण मध्य प्रदेशातील तर, दोन कर्नाटकातील असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले आहे. राज्यात 1058 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 565 जणांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहेत. राज्यात 8 जण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत. तर मुंबईत जानेवारी ते 17 मे पर्यंत 37 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत साडे चार महिन्याच्या बाळाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता, तो मुंबईतला पहिला बळी होता. 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे पालिकेने या आजाराची चांगलीच दखल घेतली असून पालिकेच्या 24 विभागात उपाययोजना सुरू केल्या आहेत ज्या ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत त्या त्या भागात जास्त लक्ष दिले जात आहे पालिकेच्या रुग्णालयात या आजारासाठी सोय करण्यात आली आहे पालिका सवॅ परीने प्रयत्न करत असून हा आजार लवकरच आटोक्यात येईल मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे तसेच औषधे व लस उपलब्ध असून जशी औषधे व लस कमी पडत असतील त्याप्रमाणे मागणी करण्यात येत आहे अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ पद्मजा केसकर यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली

हवेतून पसरणारा हा आजारसन 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात र-वाईन प-लूने शिरकाव केला होता तो आजार पालिका प्रशासनाने वेळीच आटोक्यात आणला होता पण यंदा तेवढा आजार नसून पालिका हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत हा आजार हवेतून पसरणारा आजार आहे हवे मध्ये चेंचज होतो त्याप्रमाणे आजार डोकं वर काढत असते मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये पालिका प्रशासन लवकरच हा आजार आटोक्यात आणेल
पालिका आरोग्य अधिकारी - डॉ पद्मजा केसकर
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget