भाजपाचा नारा होतो आहे यशस्वी, अंधेरी येथील काँग्रेसचा गड संपला

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – आपल्या देशात या अगोदर काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होता देशात विविध ब-याच राज्यात काँग्रेस पक्षाचेच सरकार असायचे मात्र आता या पक्षाला उतरती कळा लागली आहे देशात विविध राज्यात आता भाजप पक्षाने झेप घेतली असून सरकार र-थापन केले आहे भाजपने देशभरासह काँग्रेस पक्ष मुक्तीचा नारा दिल्या पासून काँग्रेस पक्षाची ताकद कमी होत चालली आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्वाचा व अनेक वर्षापासून काँग्रेसचा गड मानला जाणारा अंधेरी पश्चिमचा भागही आता काँग्रेसमुक्त झाला आहे केला जयवंत परब, माजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता माजी नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे अजूनही या विभागातील काही काँग्रेसचे पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद हळूहळू कमी होत असल्याचे पष्ट होत आहे

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी विभाग हा महत्त्वाचा विभाग मानला जात आहे हा विभाग गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा विभाग असायचा नगरसेवक, आमदार, खासदार काँग्रेस पक्षाचे असायचे या अंधेरी पश्चिम भागात काँग्रेसचे प्राबल्य होते सरासरी 5 ते 6 काँग्रेसचे नगरसेवक या प्रभागातून निवडून येत होते परंतु सध्या मोहसीन हैदर यांची पत्नी मेहर हैदर ही एकमेव काँग्रेसची नगरसेविका निवडून आली आहे. पालिका निवडणुकीपूर्वी अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंत परब यांच्यापाठोपाठ माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 60 मधून पराभूत झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. आंबेरकर आणि दिघे हे काँग्रेसचे हक्काचे निवडून येणारे नगरसेवक होते. परंतु त्यांनीच काँग्रेसला रामराम केल्यानंतर या भागात माजी आमदार अशोक जाधव आणि बलदेव खोसा हे दोनच नेते उरले आहेत.जोत्स्ना दिघे या सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या. परंतु चौथ्यांदा पालिका निवडणुकीत भाजपाच्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाल्या. प्रभाग क्रमांक 60 या प्रभागात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि जोत्स्ना दिघे यांच्यात प्रमुख लढत होती. परंतु शेवटच्या क्षणाला भाजपाचे उमेदवार योगीराज दाभाडकर हे निवडून आले. आता त्याच पराभूत उमेदवाराला भाजपाने पक्षात प्रवेश दिला आहे. माजी नगरसेविका वनिता मारुचा आणि माजी नगरसेवक मोहसीन हैदर हे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राहिले असले तरी मोहसीन हैदरशिवाय काँग्रेसचा प्रभाव असलेला नेता आणि पदाधिकारी अंधेरी पश्चिम भागात उरलेला नसल्यामुळे आगामी काळात काँग्रेसला पुन्हा जिवंत करणे फारच कठीण असल्याचे काँग्रसेच्या काही माजी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.तसेच काही अजून पदाधिकारी काँग्रेस सोडण्याच्यात यारीत काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा आणि अशोक जाधव हेच नेते या विभागात आता उरले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्ष हा विभाग जिवंत ठेवण्यासाठी काय रणनीती आखणार काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget