मिठी नदीच्या बाजूला पालिका लवकरच उद्यान तयार करणार

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – 26 जुलैच्या प्रलयानंतर नाव रुपाला आलेल्या आणि लोकांच्या ह्रदयात भीती निर्माण करणाऱ्या मिठी नदीचा विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे या मिठी नदीच्या बाजूला आता उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका चक्क तीन कोटीं खर्च करणार आहे. लवकरच तयार होणाऱ्या या उद्यानामुळे आता नागरिकांना मिठीच्या बाजूला फेरफटका मारता येणार आहे.

26 जुलै 2005 हा दिवस मुंबईकरांच्या अजूनही चांगलाच लक्षात आहे सवाॅची झोप उडविणा-या या मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या संपूर्ण नदीच्या किनाऱ्यावर उद्यान तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कुर्ल्यातील क्रांतिनगरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी दोन कोटी 94 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे जशी जमीन मिळत जाईल तसा किनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे मिठी नदीच्या विकासाची घोषणा अनेक वर्षांपासून होत आहे. आतापर्यंत पालिकेने फक्त परिसरातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरण केले आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी किनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारली आहे. किनाऱ्यावर उद्यान तयार केल्यावर नदीच्या प्रदूषणालाही आळा बसेल, असे पालिका प्रशासनाला वाटत आहे. घरातील कचरा नागरिक नाल्यात टाकतात मिठी नदीत असा कचरा टाकला जाऊ नये, यासाठी किनाऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या उद्यानाजवळ ठराविक अंतरावर कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. पदपथ, हिरवळ तयार करणे; तसेच हे काम पूर्ण झाल्यावर वर्षभर उद्यानाची देखभाल ठेवण्याची जबाबदारीही कंत्राटदाराची असणार आहे.

पालिका करणार सांडपाण्यावर प्रक्रिया -
मिठी नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत आहे त्यामुळे पालिके पचंड डोकेदुखी झाली आहे नाले, तसेच परिसरातील झोपड्यांमधील शौचालयांचे पाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. यावर पालिकेने उपाय शोधून काढला आहे. नदीत येणाऱ्या सांडपाण्यावर तीन टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदीच्या उगमापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या सांडपाण्यावर पवई येथील पाणीपुरवठा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येईल. साकीनाका येथील प्रक्रिया केंद्रात दररोज 44 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. तर माहीमपासून धारावीपर्यंतच्या प्रवाहातील पाण्यावर वांद्रे येथे प्रक्रिया करण्यात येणार आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget