गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील लोकांना अद्ययावत बगीचा खुला

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरातील नागरिकांना अद्यावत बगीचा मिळणार आहे लहान मुलांसाठी सीसॉ, झोपाळे, ज्येष्ठांसाठी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असलेला बगीचा शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे दिंडोशीकरांसाठी खुला करण्यात आला आहे. येथील मोना अपार्टमेंट आणि पारेख नगर वसाहतीमधील या बगीचाचे लोकार्पण विभागप्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

दिंडोशीमधील अण्णा भाऊ साठे मार्गावरील या मोना अपार्टमेंट आणि पारेख नगर या दोन वसाहतींंमधील अंतर्गत बगीचांचे सौंदर्यीकरण जिल्हा नियोजन विकास समितीचा सौंदर्यीकरण निधी मधून आमदार प्रभु यांच्या प्रयत्नाने करण्यात आले आहे. या बगीचामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी तीन आसनी बसण्याची बाक, ओपन जिम तसेच लहान मुलांसाठी झोपळ्यांसह विविध खेळणी बसविण्यात आल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बगीच्याच्या लोकार्पणामुळे बच्चेकंपनीचा आनंद व्दिगुणीत झाला आहे. म्हाडासोबत पाठपुरावा करून अंतर्गत बगीचाचे सौंदर्यीकरण करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशीयांनी शिवसेनेचे आभार मानले आहे.यावेळी विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे, माजी नगरसेवक प्रशांत कदम, दिंडोशी विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक पूजा चव्हाण, रिना सुर्वे, शाखाप्रमुख राजू घाग, कृष्णा देसाई, प्रदीप निकम यांच्यासह स्थानिक सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बगीचांमध्ये अद्ययावत सुविधा देण्यासोबत चालताना पाय घसरून पडू नये यासाठी चेकर लादी बसवण्यात आली आहे. याशिवाय बगीचालगतच्या संरक्षण कुंपणाची डागडुजी देखील करण्यात आली आहे. याशिवाय त्रिवेणी नगर येथे ज्येष्ठ नागरिकांना निवारा शेड देखील उभारण्यात आली आहे.
ज्योती हॉटेल ते पारेख नगर मनपा शाळा रस्त्याचे लोकार्पण -
आमदार प्रभु व माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या पाठपुराव्याने नव्याने डांबरीकरण केलेल्या ज्योती हॉटेल ते पारेख नगर मनपा शाळेपर्यंतच्या अंदाजे बारा मीटर रुंद रस्त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget